विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. नुकतंच अमृताने तिचा चंद्रा या भूमिकेबद्दलचा प्रवास आणि त्यातील काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने चंद्रमुखी आणि नथ याबद्दलचा एक किस्सा शेअर केला आहे. यासोबत तिने एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत तिचे नाक टोचत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावेळी तिला होणारा त्रासही दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने नथीचा किस्सा सांगितला आहे.

‘चंद्रमुखी’साठी आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकरची निवड का केली? प्रसाद ओकने सांगितले कारण

अमृता खानविलकरची इन्स्टाग्राम पोस्ट

“नथ आणि चंद्रमुखी

माझ्या दिग्दर्शकाला प्रसाद ओकला सगळं ओरिजिनल हवं होतं…. तेव्हा “अमृता नाक टोचायचं…. क्लिपवाल्या नथी मी तुला घालू देणार नाही” असं त्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलं… आणि म्हणूनच अश्या पद्धतीने मी अडीच वर्षांपूर्वीच नाक टोचलं.

त्यानंतरही ते बुजलं….दुखलं…..मग परत टोचावं लागलं… पण शूटिंगपर्यंत नथ आणि माझी जुगलबंदी सुरूच राहिली…. त्यात पु.ना, गाडगीळ ह्यांनी खऱ्या सोन्याच्या नथीं केल्या तेव्हा नाचताना त्या इतक्या जड होत असत, कि पॅक-अप नंतर त्यावरचं रक्त आधी कोमट पाण्याने आम्ही काढायचो आणि मग नाथ काढायचो. तर चंद्राची कुठली नथ तुम्हाला जास्त आवडली ओ ?”, असे अमृताने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान अमृताची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री मानसी नाईकने कमेंट करताना म्हटले की, ‘मी तुला अशाप्रकारे रडताना बघू शकत नाही’. तर प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक ‘अरेरे..बिचार चंद्रा’, अशी कमेंट केली आहे.

“मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती…”, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक दावा

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director prasad oak force amruta khanvilkar to nose piercing for chandramukhi marathi movie share instagram post nrp
First published on: 10-04-2022 at 13:00 IST