scorecardresearch

“मी कधीच त्यांच्याशी मानधनाविषयी चर्चा करत नाही” : रोहित शेट्टीने शेअर केला स्टार्सबरोबर काम करण्याच्या अनुभव!

येणाऱ्या काळात त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान चालतील असा त्याला आत्मविश्वास आहे.

“मी कधीच त्यांच्याशी मानधनाविषयी चर्चा करत नाही” : रोहित शेट्टीने शेअर केला स्टार्सबरोबर काम करण्याच्या अनुभव!
रोहित शेट्टी सूर्यवंशी टीम | rohit shetty sooryvanshi team

चित्रपटसृष्टीमधली सध्याच्या सगळ्याच मोठ्या स्टार्सबरोबर काम केलेला दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. कोविडनंतर जेव्हा चित्रपटगृह सुरू झाली तेव्हा ५०% क्षमतेच्या जोरावरसुद्धा रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’सारखा चित्रपट सुपरहीट करून दाखवला. रोहितच्या कॉप युनिव्हर्समधल्या या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ होते, शिवाय अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्यामुळे चित्रपटाची मजा द्विगुणित झाली. अशा मोठमोठ्या स्टार्सबरोबर काम करताना सर्वात जास्त दडपण असतं ते बजेटचं आणि या स्टार्सच्या मानधनाचं. याचविषयी रोहित शेट्टीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

रोहित म्हणतो, “मी जो काही पैसा खर्च करतो तो चित्रपट बनवण्यासाठी खर्च करतो. मी कधीच अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याशी त्यांच्या मानधनाबद्दल चर्चा करत नाही. इतर फिल्ममेकर्स आणि निर्माते ज्यापद्धतीने स्टार्सबरोबर बसून बोलतात, चर्चा करतात तसं मी काहीच करत नाही. याबाबतीत मला कधीच कुठल्याच स्टारने आडकाठी केली नाही. माझ्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला माहीत असतं की जर हा चित्रपट चालला तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. त्यामुळे मी कायम माझ्या चित्रपटाचा सर्वप्रथम विचार करतो आणि एकंदर त्या चित्रपटावरच मी रक्कम खर्च करतो.”

मुलाखतीत रोहितने त्याच्या आगामी वेबसिरिजबद्दलसुद्धा खुलासा केला आहे. ‘इंडियन पोलिस फोर्स’ ही वेबसिरिज त्याच्या कॉप युनिव्हर्सशीच जोडलेली असणार आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. रोहितने सिद्धार्थच्या कामाची प्रशंसा केली आहे. रोहित म्हणतो की सध्याचे सगळेच तरुण अभिनेते हे प्रचंड मेहनती आहेत आणि तेसुद्धा माझ्याशी कधीच पैशांबद्दल बोलत नाहीत.

सध्या बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत याबद्दलसुद्धा रोहितने स्पष्टीकरण दिलं आहे. येणाऱ्या काळात त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान चालतील असा त्याला आत्मविश्वास आहे. तो म्हणतो, “मी माझी चित्रपट बनवण्याची पद्धत बदललेली नाही, जेव्हा संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये तणावाचं वातावरण होतं तेव्हा मी आणि माझ्या टीमने शांत राहून आमच्या कामावर लक्षकेंद्रित केलं आहे. कारण आम्ही जे चित्रपट बनवतो त्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे.”

रोहितची आगामी वेबसिरिज ही प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार असून त्यात शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉयदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याबरोबरच रोहित त्याच्या ‘सिंघम’ आणि ‘गोलमाल’च्या पुढच्या भागासाठी तयारी करत आहे.

आणखीन वाचा : रोहित शेट्टीचा दिलदारपणा; आर्थिक संकटात असलेल्या अभिनेत्रीच्या मदतीला धावला

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Director rohit shetty says he never sits with stars to discuss their fees avn