‘काश्मीर मेरा है’; दिग्दर्शकाच्या ट्विटवरून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण

स्टँडअप कॉमेडियन कुणाल काम्राने अग्निहोत्रींच्या या ट्विटवर उपरोधिक टीका केली आहे.

vivek agnihotri
विवेक अग्निहोत्री

काश्मीर हा एक असा मुद्दा आहे ज्यावर मत मांडणं किंवा प्रतिक्रिया देणं लोक टाळतात. अशात ‘ताश्कंद फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीरसंदर्भात केलेला एक ट्विट चर्चेचा विषय ठरला आहे. ‘काश्मीर मेरा है’ असं ट्विट विवेक यांनी केलं आणि त्यावर नेटकऱ्यांचे भरभरून कमेंट्स येऊ लागले आहेत.

काश्मीर मेरा नहीं बल्कि हमारा है, अशी कमेंट काही युजर्सनी केली आहे. तर ‘काश्मीर १३० कोटी भारतीयांचा आहे’ असं एकाने म्हटलंय. काही नेटकऱ्यांनी अग्निहोत्रींवर टीकासुद्धा केली आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल काम्राने अग्निहोत्रींच्या या ट्विटवर उपरोधिक टीका केली आहे. ‘होय, आणि १४ फ्लॉप चित्रपटसुद्धा तुझेच आहेत,’ असं ट्विट करत कुणालने खिल्ली उडवली.

विवेक लवकरच काश्मिरी पंडितांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. ‘काश्मीर फाइल्स’ असं या चित्रपटाचं नाव असून येत्या काही महिन्यांत त्याच्या शूटिंगला सुरुवात होईल. अग्निहोत्रींच्या ‘ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाची प्रेक्षक-समीक्षकांनी प्रशंसा केली होती. लालबहादूर शास्त्री यांच्या रहस्यमयी मृत्यूवर हा चित्रपट आधारित आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Director vivek agnihotri tweet kashmir mera hai turned into debate ssv

Next Story
फेलिक्स बॉमगार्टनर
ताज्या बातम्या