‘डिस्को डान्सर’च्या निर्मात्यांवर कोसळले आर्थिक संकट, पत्नीच्या उपचारासाठी मागितली मदत

त्यांनी चाहत्यांकडे आर्थिक मदतीची विनंती केली आहे.

Disco Dancer, Disco Dancer filmmaker, B Subhash, B Subhash wife,

बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटाची निर्मिती करणारे बी सुभाष यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्याकडे पत्नीच्या उपचारासाठी देखील पैसे नाहीत. त्यासाठी त्यांनी चाहत्यांना मदत करण्याची विनंती केली आहे.

बी सुभाष यांची पत्नी तिलोत्तमा यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बी सुभाष यांची मुलगी श्वेताने दिलेल्या माहितीनुसार, तिलोत्तमा यांना फुफ्फुसाचा आजारावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचारासाठी जवळपास ३० लाख रुपयांची गरज आहे. रक्कम मोठी असल्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. कृपया मदत करा अशी विनंती श्वेताने केली आहे.
आणखी वाचा : ‘पुढचा प्रवास खडतर असेल तर…’, अमेय वाघने खरेदी केली नवी कार

अभिनेत्री सेलिना जेटलीने ट्विटरवर डिस्को डान्सर चित्रपटाचे निर्माते बी सुभाष यांना मदत करण्याचे चाहत्यांना आवाहन केले आहे. ‘डिस्को डान्सर चित्रपटाचे निर्माते बी सुभाष यांची पत्नी रुग्णालयता आहे आणि कुटुंबीय त्यांच्या उपचारासाठी पैसे गोळा करत आहेत. डिस्को डान्सर हा त्यांच्या १९८० सालातील अतिशय हिट चित्रपट होता’ या आशयाचे ट्वीट सेलिना जेटलीने केले आहे.

‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती बी सुभाष यांनी केली होती. हा चित्रपट त्यावेळी चर्चेत होता. चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली होती. हा चित्रपट देशातच नव्हे तर परदेशातही हिट ठरला होता. मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबतच ओम पुरी आणि राजेश खन्ना यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Disco dancer filmmaker b subhashs wife hospitalised and family appeals for funds avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या