‘मनी माफिया- इंडियाज किंग कॉन्स’चा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला

२४ नोव्हेंबर रोजी सीरिजचा दुसरा भाग डिस्कव्हरी प्लस या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

money mafia, money mafia series,
२४ नोव्हेंबर रोजी सीरिजचा दुसरा भाग डिस्कव्हरी प्लस या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

आपल्या पहिल्या सीजनला मिळालेल्या भव्य यशानंतर डिस्कव्हरी प्लस आता आपला अतिशय ‘मनी माफिया- इंडियाज किंग कॉन्स!’ ह्या शोच्या दुस-या सीजनसाठी सज्ज आहे. ह्या डॉक्युमेंटरीचा हा नवीन सीजन २४ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीजनमध्ये आपल्याला देशातील काही अतिशय मोठे नवीन आर्थिक घोटाळे पाहायला मिळणार आहे.

पोंझी योजनांपासून सायबर घोटाळे ते कॉल सेंटर स्कॅम्स आणि बँकिंग घोटाळे अशा अनेक धक्कादायक आर्थिक गैरव्यवहारांवर ह्या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहेत. चंद्रा टॉकीजची निर्मिती असलेल्या ह्या डॉक्युमेंटरीला डिस्कव्हरीच्या प्लसच्या दर्शकांकडून भव्य प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या उत्सुकता पाहता डिस्कव्हरी प्लसने केवळ भारतीयांवरच नाही तर जगातील लोकांवर आधारीत हा सीजन प्रेक्षकांसाठी आणली आहे.

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

गुन्हेगारी असलेल्या शोची दर्शकांमध्ये असलेली वाढती मागणी पाहता मनोरंजनासाठी या सत्य घटनांवर आधारीत असलेल्या कहानी दाखवण्यात येणार आहेत. पहिल्या भागामध्ये एका खोट्या आयआरएस कॉल सेंटर द्वारे करण्यात आलेला तब्बल ३० कोटी डॉलर्सचा गैरव्यवहार उलगडला जाईल. जिथे शेकडो ऑपरेटर्स हे अमेरिकन आयआरएसचे (इंटर्नल रेव्हेन्यू सर्विस) प्रतिनिधी असल्याचे भासवत होते आणि संशय येणार नाही अशा प्रकारे अमेरिकन नागरिकांकडून पैसे उकळण्यासाठी त्यांना कॉल करत होते. करोना महामारीमुळे अनेक प्रकारच्या घोटाळ्यांना चालना मिळाली असताना २९ नोव्हेंबर रोजी सादर होणाऱ्या दुसऱ्या भागामध्ये केरळमधील नॉन बँकिंग फायनान्स कंपनीने २ हजार कोटींचा घोटाळा कसा केला हे बघता येईल.

आणखी वाचा : प्रियांका होणार आई? निकसोबत चाहत्यांनाही बसला धक्का

तिसऱ्या भागामध्ये भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध स्टॉक मार्केट ब्रोकर्सपैकी एक असलेल्या व अनेकदा स्टॉक मार्केटचा सूत्रधार (पिएड पायपर) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केतन पारेखविषयी सांगितले जाईल. क्रिप्टोकरंसी अँड फ्रॉड्स अराउंड इट ह्या चौथ्या भागामध्ये अतिशय प्रसिद्ध व नवीन डिजिटल गुंतवणुकीकडे लक्ष वेधले जाईल व ही कहाणी आपली आयुष्यभराची बचत गमावलेल्या पीडित व्यक्तींद्वारे सांगितली जाईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Discovery plus launchesn season 2 of critically acclaimed series money mafia dcp