दिशा पटानीने शेअर केला मार्शल आर्ट्स ट्रेनिंगचा व्हिडीओ, टायगर श्रॉफ म्हणाला, “अखेर तू…”

दिशा ही अभिनयासह मार्शल आर्टसमध्येही तज्ज्ञ आहे.

अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. त्याचसोबत दिशा तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. वर्कआउट करतानाचे किंवा तिच्या ट्रेनिंगचे विविध व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. दिशा ही अभिनयासह मार्शल आर्टसमध्येही तज्ज्ञ आहे. ती नेहमी स्वत:ला विविध आव्हाने देत असते असते. नुकतंच तिने ७२० डिग्री किक मारण्याचे कठीण चॅलेंज पूर्ण केले आहे.

नुकतंच दिशाने याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये पाहायला मिळत आहे. यात दिशाने रेड बॉक्सर आणि काळ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केले आहे. यानंतर ती पूर्ण ताकदीने ७२० डिग्रीमध्ये किक मारताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच या व्हिडीओवर कमेंट करताना एक नेटकरी म्हणाला, “आग लावू टाकलीस”. तर दुसऱ्याने “तुझ्यात हळूहळू टायगर श्रॉफची लक्षण दिसायला लागली आहेत,” असे म्हटले.

विशेष म्हणजे तिच्या या व्हिडीओवर अभिनेता टायगर श्रॉफनेही कमेंट केली आहे. “अखेर तू हे करुन दाखवलं. खूप छान,” असे टायगर श्रॉफ म्हणाला. विशेष म्हणजे टायगरने यावेळी दिशाचा ट्रेनर राकेश यादव याचेही कौतुक केले आहे. दरम्यान टायगर श्रॉफ हा स्वत: एक मार्शल आर्टस खेळाडू आहे.

दरम्यान अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील कपल आहे. ते दोघे नेहमी डिनर डेट किंवा लंचसाठी एकत्र जाताना दिसत असतात. मात्र दोघांनी त्यांच्या नात्याची अद्याप कबुली दिलेली नाही. दिशा लवकरच मोहित सुरुच्या ‘एक व्हिलन रिटर्न’ सिनेमामध्ये झळकणार आहे. या सिनेमात दिशासोबत अभिनेता अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Disha patani 720 degree kick tiger shroff is impressed and comment on video nrp

ताज्या बातम्या