दिशा पटानीने केली नाकाची सर्जरी? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दिशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

disha patani, disha patani nose surgery,
दिशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Photo Credit : Varinder Chawla Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. दिशा ही सोशल मीडयावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, काल दिशा अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचली होती. इथला दिशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, यावेळी तिने सर्जरी केली असं नेटकऱ्यांच म्हणणं आहे.

दिशाचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत दिशाने पिवळ्या रंगाचा टॉप आणि जीन्स परिधान केली आहे. दिशा यात सुंदर दिसत असली तरी यावेळी तिचा हा व्हिडीओ वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

दिशाचा हा व्हि़डीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘आणखी एक अभिनेत्री हिने देखील तिचा चेहरा खराब केला.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तिने तिच्या नाकाला काही तरी केलं आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही वेगळीच दिसते.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘ती आधी मस्त दिसत होती तिला चेहऱ्यावर काही करण्याची गरज नव्हती.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तिने नाकाला किंवा ओठांना नक्कीच सर्जरी केली आहे.’

दरम्यान, दिशा आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा अॅक्शन थ्रिलर पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपट ८जुलै २०२२ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज आणि बालाजी टेलिफिल्म्स करत आहेत. या आधी दिशा सलमानसोबत ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Disha patani did nose surgery netizens ask her questions dcp

Next Story
घटस्फोटानंतर समांथाने घेतली नागार्जुनची भेट, जाणून घ्या कारण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी