गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार घटस्फोट घेत असल्याचे समोर आले आहे. अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावपासून वेगळ्या होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने पती नागा चैतन्यला घटस्फोट दिला. त्यापाठोपाठ आता धनुषने पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे झाल्याची घोषणा केली. कलाविश्वातील अशा बऱ्याच जोड्या आहेत, ज्यांनी घटस्फोटाचे वृत्त सांगत चाहत्यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर महाभारत मालिकेत काम करणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी ‘घटस्फोट हे मृत्यूपेक्षाही वेदनादायी असू शकतो’ असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीश यांनी जवळपास १२ वर्षांनंतर आयएएस अधिकारी असलेल्या पत्नीला घटस्फोट दिला. सप्टेंबर २०१९मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन जुळ्याच्या मुली असून त्या आईसोबत इंदौर येथे राहतात. घटस्फोटाविषयी ‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना ते म्हणाले, ‘मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात मी सप्टेंबर २०१९मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आम्ही वेगळे होण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण मला सांगायचे नाही. सध्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. मी इतकेच सांगेन की घटस्फोट हे मृत्यूपेक्षाही वेदनादायी असू शकतात.’
आणखी वाचा : एक वडील म्हणून…; नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर नागार्जुनची प्रतिक्रिया

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divorce can be more painful than death said by actor nitish bharadwaj avb
First published on: 18-01-2022 at 12:14 IST