मालिकांध्ये दिवाळी सणाचा जल्लोष

आनंदाची उधळण करीत, आली दिवाळी आली…

आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांध्येही दिवाळी सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा- कार्तिक आणि श्वेता-आदित्यची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी. त्यामुळे इनामदार कुटुंबामध्ये दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे. फराळ बनवण्याची स्पर्धाही घेण्यात आली आहे. त्यामुळे झटपट आणि खमंग फराळ कोणी बनवला याची उत्सुकता नक्कीच असेल.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत देखिल गौरी आणि जयदीपची पहिलीच दिवाळी आहे. खास बात म्हणजे जयदीप गौरीला पाडव्याचं खास गिफ्टही देणार आहे. जयदीप प्रमाणेच ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील शुभमनेही कीर्तीसाठी पाडव्याचं खास गिफ्ट प्लॅन केलं आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने या दोन्ही जोड्यांमध्ये नवं नात उमलेल का याची देखिल उत्सुकता असेल.

आणखी वाचा : “तिच्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही”; शहनाजच्या वडिलांनी केला निर्धार

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत अंजी घर सोडून गेली आहे. आता दिवाळीच्या निमित्ताने तिचा गृहप्रवेश होणार का? हेदेखिल दिवाळी विशेष भागात पाहायला मिळेल.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १५ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर ‘कॉमेडी बिमेडी’ हा नवा कार्यक्रम देखील सुरु होत आहे. आशिष पवार, दिगंबर नाईक, अतुल तोडणकर, मंगेश देसाई, किशोरी अंबिये, आरती सोळंकी, संतोष पवार, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, परी तेलंग, प्राजक्ता हनमघर, शेखर फडके, बालाजी सुळ, देवयानी मोरे, शर्वरी लहादे आणि पूर्णिमा अहिरे या सोळा विनोदवीरांच्या धमाकेदार विनोदांनी यंदाच्या दिवाळीत हास्याचे फटाके फुटणार हे मात्र नक्की.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Diwali celebration in marathi serials ssv