“भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही”; अमोल कोल्हे घेऊन येताहेत ऐतिहासिक चित्रपट, पाहा टीझर

अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या नवीन ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे.

amol kolhe amol kolhe movie
अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या नवीन ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे.

मराठीमध्ये एकापोठापाठ एक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांकडे प्रेक्षकांचा ओढा देखील वाढला आहे. अशामध्येच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे, ‘गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. अवघ्या काही सेकंदांचा हा टीझर पाहून अंगावर अगदी शहारा येतो.

आणखी वाचा – “आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा”; एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेनंतर किरण मानेंचा संताप

अभिनेते अमोल कोल्हे यांचं इतिहासावर किती प्रेम आहे हे आपण वारंवार पाहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका म्हटलं की अमोल कोल्हे यांचा चेहरा डोळ्यापुढे उभा राहतो. अमोल कोल्हे यांनी ‘गरुडझेप’ चित्रपटामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या टीझरमध्ये अमोल कोल्हे यांचा पाठमोरा भाग दिसत आहे. तसेच टीझरची सुरुवातच त्यांच्या दमदार संवादाने होते.

पाहा टीझर

“भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही” हा संवाद विशेष लक्षवेधी ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून सुटका आणि त्यादरम्यान घडलेला प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. शिवप्रताप या सीरिज अंतर्गत चार ऐतिहासिक चित्रपटांमधून इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा अमोल कोल्हे यांचा प्रयत्न आहे. त्यातीलच ‘गरुडझेप’ हा एक चित्रपट आहे.

आणखी वाचा – Photos : घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना सिद्धार्थ जाधवच्या पत्नीची मुलींबरोबर पार्टी, पाहा फोटो

चित्रपटाचा टीझर पाहता यामध्ये दमदार संवाद आणि उत्तम चित्रण पाहायला मिळणार असं दिसतंय. जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr amol kolhe announce his new historical movie garudjhep teaser release on social media watch video kmd

Next Story
अँबर हर्ड प्रकरणानंतर Disney ने मागितली जॉनी डेपची माफी, २ हजार कोटींची दिली ऑफर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी