करोना निर्बंध शिथील झाल्यानंतर नव-नवीन विषयांवरील अनेक नाटके दाखल पाहायला मिळाली. नाटकाचा विषय कोणताही असो, विनोदी, गंभीर, सस्पेन्स, आपल्या अनोख्या शैलीत ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांचा हातखंडा आहे अशा दिग्दर्शकांमध्ये विजय केंकरे हे नाव अग्रस्थानी आहे. विजय केंकरे ‘३८ कृष्ण व्हिला’ हे नवं नाटक घेऊन रंगभूमीवर येत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकात अभिनयाचा हुकमी एक्का असलेले अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका आणि अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे दिसणार आहेत. डॉ. गिरीश ओक यांचे हे ५० वे नाटयपुष्प आहे. या त्रिवेणी संगमामुळे ‘३८ कृष्ण व्हिला’ हे नाटक प्रेक्षकांसाठी दर्जेदार मेजवानी असणार यात शंका नाही. मल्हार आणि रॉयल थिएटर निर्मित या नाटकाचा शुभारंभ शनिवार १९ मार्चला होणार आहे.

‘ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख’? नाटकाची ही टॅगलाइन त्यातील गर्भित अर्थ दाखवून देणारी आहे. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा… गझलकार इलाही जमादार यांच्या या ओळीतुन चेहऱ्यामागचं खरं गुपित उलगडून दाखवलयं ‘३८ कृष्ण व्हिला’ या नाटकातूनही चेहऱ्यामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न असणार आहे.

Krishnan kumar and Tishaa kumar
अभिनेते व चित्रपट निर्माते कृष्ण कुमार यांच्या लेकीचे कर्करोगाने वयाच्या २१ व्या वर्षी निधन
marathi actress Prajakta Gaikwad
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला ‘मराठी’ची भुरळ, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणते, “ओटीटीच्या स्पर्धेत मराठी…”
actors in movie ek don teen char in loksatta office for movie promotion
एकापेक्षा अधिकचा भन्नाट विषय; आगामी ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटातील कलावंतांचा ‘लोकसत्ता’शी संवाद
biopic, Laxman Utekar, Vicky Kaushal,
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावरच चरित्रपट होऊ शकतो – विकी कौशल
marathi actress special connection with kalki 2898 AD movie
मराठमोळ्या अभिनेत्रीचं आहे ‘Kalki 2898 AD’ चित्रपटाशी खास कनेक्शन! कमल हासन यांचा उल्लेख करत म्हणाली…
gaurav more write special post for satya movie
२६ वर्षांपूर्वीच्या बॉलीवूड चित्रपटासाठी गौरव मोरेची खास पोस्ट! शाहरुख-सलमान नव्हे तर ‘या’ अभिनेत्याने साकारलीये प्रमुख भूमिका
bollywood actress meenakshi seshadri dance with Choreographer ashish patil video viral
Video: ८०-९०च्या दशकात बॉलीवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखंत का? प्रसिद्ध मराठी नृत्यदिग्दर्शकासह केलेल्या सुंदर नृत्याने वेधलं लक्ष
Ishq Vishk Rebound movie directed by Nipun Avinash Dharmadhikari
मैत्री आणि प्रेमाचा जांगडगुत्ता

आणखी वाचा : “राज साहेबांनी ‘ते’ २ दिवसात करून दाखवलं…”, The Kashmir Files प्रकरणावरून केआरकेचा कॉंग्रेसला टोला

आणखी वाचा : “कर्जाचे पैसे परत करण्याची माझी सध्या ऐपत नसून माझ्यावर चार-पाच…”, अभिनेता करणवीर बोहराने केला धक्कादायक खुलासा

‘३८ कृष्ण व्हिला’ नाटकामध्ये डॉ.गिरीश ओक ‘देवदत्त कामत’ या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. देवदत्त कामत या व्यक्तीवर नंदिनी चित्रे, ही अनोळखी स्त्री एक गंभीर आरोप करते आणि त्यांच्यापुढे उभे राहते एक नवे आव्हान, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे! ‘३८ कृष्ण व्हिला’ ह्या घरात भरला जातो एक आगळा वेगळा खटला, सुरू होते आरोप प्रत्यारोपांची मालिका, वाद प्रतिवादांच्या फैरी झडतात आणि समोर येते एक धक्कादायक वास्तव! या पार्श्वभूमीवर बेतलेले हे नाटक अनेक रंजक वळणांनी प्रेक्षकांच मनोरंजन करणार असणार आहे.

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

डॉ. श्वेता पेंडसे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित तसेच डॉ. गिरीश ओक, डॉ. श्वेता पेंडसे अभिनीत ‘३८ कृष्ण व्हिला’ या नाटकाचा शुभारंभ शनिवार १९ मार्चला दीनानाथ नाटयगृह पार्ले येथे दुपारी ४.१५ वा. होणार आहे. तसेच रविवार २० मार्चला दुपारी ४.३० वा. गडकरी रंगायतन येथे प्रयोग असणार आहे. या नाटकाची निर्मीती मिहीर गवळी यांनी केली असून सहनिर्माते उत्कर्ष मेहता, ऋतुजा शिदम आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. संगीत अजित परब तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे.