रंगभूमी, मालिका आणि चित्रपट विश्वात चतुरस्र अभिनेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. गिरीश ओक यांचे पन्नासावे नाटक रसिकांच्या भेटीला आले आहे. ‘‘करोनामुळे माझा नाटय़प्रवास ४९व्या नाटकांवर थांबला होता, परंतु आता सर्वच सुरू झाल्याने माझे पन्नासावे नाटक प्रेक्षकांसमोर आले आहे याचा मला आनंद वाटतो,’’ अशी भावना रंगभूमीवर नाटकांचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या गिरीश ओक यांनी व्यक्त केली.  

डॉ. गिरीश ओक यांच्या‘‘३८ कृष्ण व्हिला’ या नव्या नाटकाचा पहिला प्रयोग नुकताच विलेपार्ले येथील दीनानाथ नाटयगृहात पार पडला. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ गिरीश ओक हे नाव नाटय़रसिकांच्या हृदयात आहे. ‘कुसुम मनोहर लेले’ या गाजलेल्या नाटकातून त्यांनी ‘मनोहर लेले’ आणि ‘भाच्या’ असे पात्र रंगविले होते. त्यात त्यांच्या ‘भाच्या’ या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. ‘तो मी नव्हेच’ या अजरामर नाटकातील नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी गाजवलेली ‘लखोबा लोखंडे’ ही व्यक्तिरेखाही त्यांनी साकार केली होती.नाटकांबरोबरच चित्रपट आणि मालिकेतूनही ते प्रेक्षकांसमोर आले. अलीकडेच ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून त्यांच्या ‘अभिजित राजे’ या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलेच उचलून धरले. ‘‘जेव्हा मी १९८४ साली व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईला आलो तेव्हा व्यावसायिक आणि प्रायोगिक असे जाणवण्याइतपत दोन प्रवाह होते. कालांतराने रंगभूमीवर काही नवे लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, नट आले. गिरीश जोशी, विवेक बेळे, अभिराम भडकमकर यांनी अशी नाटके थेट व्यावसायिक रंगभूमीवर आणली, जी कदाचित प्रायोगिक रंगभूमीवर काही काळापूर्वी आली असती तर बंदच झाली असती. ही नाटकं पाहायला प्रेक्षकही यायला लागला. सध्या नाटकांसाठी फार सुखाचा काळ आहे असे मी म्हणेन, कारण चांगले बदल या नाटय़सृष्टीत होत आहेत ज्याचा फायदा तरुण नाटककारांनीही करून घ्यायला हवा,’’ अशी अपेक्षाही त्यांनी या नव्या नाटकाच्या निमित्ताने व्यक्त केली.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..

 ‘३८ कृष्ण व्हिला’ या नाटकातून चेहऱ्यामागचा खरा माणूस शोधण्याचा प्रयत्न कसा असेल असा विषय मांडण्यात आला आहे. या नाटकात डॉ. गिरीश ओक हे ‘देवदत्त कामत’ या भूमिकेतून दिसणार आहेत.  डॉ. श्वेता पेंडसे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित ‘३८ कृष्ण व्हिला’ या नाटकात डॉ. गिरीश ओक यांच्याबरोबर डॉ. श्वेता पेंडसेही मुख्य भूमिकेत आहेत.