यशस्वी चित्रपट देणारे दिग्दर्शक संजय जाधव ‘दिल दोस्ती दुनियादारी’ नंतर आता ‘दुहेरी’ ही नवी मालिका घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू होणारी ‘दुहेरी’ ही नवी मालिका थ्रीलर सस्पेन्स आहे.

मैथिली आणि नेहा या दोन बहिणींची कथा या मालिकेत सादर करण्यात आली आहे. दोघी बहिणींच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचे नाटय़ मालिकेत सादर करण्यात आले आहे. मैथिली आणि नेहा या दोन भूमिका अनुक्रमे ऊर्मिला निंबाळकर व अमृता पवार करत आहेत. अभिनेते सुनील तावडे हे ‘परसू’च्या भूमिकेद्वारे खलनायक सादर करत असून मालिकेत निवेदिता सराफ, तुषार दळवी, रवींद्र महाजनी आदी कलाकार आहेत. सोमवार ३० मेपासून ‘दुहेरी’ स्टार प्रवाहवरून ही मालिका सुरू झाली असून सोमवार ते शनिवार दररोज रात्री साडेआठ वाजता मालिकेचे प्रसारण होणार आहे.

RCB Captain Faf Du Plessis Fined 12 lakhs for Slow over Rate And PBKS Sam Curran Breach IPL Code of Conduct 50 percent Match
IPL 2024: पराभूत संघांच्या दोन्ही कर्णधारांवर कारवाई; डु प्लेसिसला १२ लाखांचा दंड, तर सॅम करनचं अर्ध मानधन कापलं
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात चाललंय तरी काय? मोहम्मद नबीने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी केली डिलीट, काय आहे कारण?
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Wakad Police Arrest 10 for IPL Betting Extortion through Betting
पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दहा जण अटकेत