राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं काही दिवसांपूर्वीच ‘मूड बना लिया’ गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले. आता या गाण्याच्या यशानंतर त्यांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांचं नवं गाणं प्रदर्शित केलं. पण या गाण्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – ‘पठाण’बाबत बोलणाऱ्या कंगना रणौतला युजरने करुन दिली तिच्या ‘धाकड’ चित्रपटाची आठवण, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, “भारताने जशी…”

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

‘भारतीयन्स’ या चित्रपटातील ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’ हे अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित झालं. अमृता फडणवीस यांनी खास पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. तसेच गाण्याचा व्हिडीओही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. पण नेटकरी मात्र हे गाणं ऐकून त्यांच्यावर नाराज झाले आहेत.

नेटकऱ्यांनी अमृता यांच्या या गाण्याला नापसंती दर्शवली आहे. तर अनेकांनी गाणं आवडलं नसल्याचं कमेंट्सच्या माध्यमातून सांगितलं आहे. हा मराठी माणसांवर अत्याचार आहे, भसाडा आवाज आणि अल्बम काढून कोणी सुंदर व स्टार होत नाही, तुम्ही गाणं गाऊ नका, हा तर देशाचा अपमान अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, म्हणाल्या, “तो भारताचा…”

अमृता फडणवीस यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं. त्यांना या गाण्यावरुनही बरंच ट्रोल करण्यात आलं. या गाण्याचं प्रमोशन करतानाही त्या दिसल्या. पण त्यांच्या देशभक्तीपर गाण्याला मात्र प्रेक्षकांनी नापसंत केलं आहे.