करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सन आणि त्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

“जनता तुला माफ करणार नाही”; रियाला पाठिंबा देणाऱ्या तापसीवर अभिनेता संतापला

ड्वेन उर्फ WWE सुपरस्टार द रॉक याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. “गेल्या आठवड्यात मला व माझ्या कुटुंबीयांना करोनाचा लागण झाली होती. सुरुवातीला मी खूप घाबरलो होतो. मला माझ्या मुलींची खूप काळजी वाटत होती. परंतु योग्य उपचारामुळे आमची तब्येत आता सुधारत आहे. आणखी काही दिवस आम्हाला क्वारंटाइनमध्ये राहावंच लागणार आहे. करोनाची लागण तुम्हाला कधीही कुठेही होऊ शकते त्यामुळे स्वच्छता राखा आणि स्वत:ची काळजी घ्या.” असं म्हणत रॉकने आपल्या चाहत्यांना करोनापासून सावधान केलं.

“या पैशांनी गरीबांची मदत करा”; नव्या कारमुळे बिग बींना केलं जातय ट्रोल

करोनामुक्त होण्याचे प्रमाण ७७ टक्के

भारतात दैनंदिन करोना रुग्णवाढीचा आकडा ७० हजारांहून अधिक आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ७८ हजार ३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशभरात रुग्णसंख्या ३७ लाख ६९ हजार ५२३ वर पोहोचली. मृत्यूची संख्याही वाढत असून ती ६६ हजार ३३३ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १,०४५ रुग्णांचा मृत्यू झाला.

करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्येतही वाढ होत असून सलग सहाव्या दिवशीही ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. १२ राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय सरासरी ७६.९८ टक्के आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता २९ लाख १ हजार ९०८ झाली असून ती उपचाराधीन रुग्णांपेक्षा २० लाखांहून अधिक आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये १० लाख रुग्ण बरे झाले. त्याआधी २२ दिवसांमध्ये ही संख्या गाठली गेली होती. महाराष्ट्र व तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये मिळून ३० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ६२ हजार २६ रुग्ण करोनामुक्त झाले.