हुबेहूब ‘द रॉक’, ‘तो’ व्हायरल फोटो पाहून हॉलिवूडस्टार ड्वेन जॉनसनही झाला थक्क म्हणाला…

हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉनसन म्हणजेच ‘द रॉक’ सारखी दिसणारी ही व्यक्ती अमेरिकेतील मॉर्गन काउंटी इथं पोलीस अधिकारी आहे.

the rock-looklike-viral-photo
(Photo-Instagram@therock/facebook@Morgan County Sheriff's Office)

सोशल मीडियावर आजवर आपण शाहरुख खान, सलमान खान किंवा ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा या बॉलिवूड सेलिब्रिटींसारख्याच दिसणाऱ्या त्यांच्या ड्युप्लिकेटचे अनेक व्हायरल फोटो पाहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय हॉलिवूडस्टार ‘द रॉक’ सारख्याचं दिसणाऱ्या एका व्यक्तीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हे फोटो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण ही व्यक्ती हुबेहूब रॉकसारखीच दिसते.

हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉनसन म्हणजेच रॉक सारखी दिसणारी ही व्यक्ती अमेरिकेतील मॉर्गन काउंटी इथं एक पोलीस अधिकारी आहे. लेफ्टनंट एरिक फिल्ड्स असं असं या अधिकाऱ्याचं नाव असून तो हुबेहूब रॉक सारखाच दिसतो. लेफ्टनंट एरिक फिल्ड्सचे सोशल मीडियावरील फोटो पाहून आपण एखाद्या सिनेमातील पोलिसाची भूमिका साकारणाऱ्या द रॉकलाच पाहत आहोत असा भास कुणालाही होईल. एरिक फिल्ड्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक जण त्याच्या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. एवढचं काय तर हॉलिवूडस्टार ‘द रॉक’ने हे फोटो पाहून त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. रॉकने ट्विटरवर प्रतिक्रिया दिलीय.

हे देखील वाचा: “या मुलासोबत तुझी स्पर्धा आहे”, राकेश बापटला पाहून जया बच्चन अभिषेकला म्हणाल्या होत्या…

हे देखील वाचा: Viral Video: “कुणीतरी हिला साडी नेसायला शिकवा”; बोल्ड लूकमुळे मल्लिका शेरावत ट्रोल

एक बातमी शेअर करत रॉक म्हणाला, “अरे व्वा. माझ्या डावीकडील व्यक्ती माझ्याहून कूल आहे. सुरक्षित राहा भावा आणि तुझ्या सेवेबद्दल धन्यवाद. आपण एक दिवस नक्की भेटू. मला तुझ्याकडून रॉक स्टोरीज ऐकायच्या आहेत” अशा आशयाचं ट्वीट ‘द रॉक’ने केलंय.

लेफ्टनंट एरिक फिल्ड्स  गेल्या १७ वर्षांपासून पोलीस विभागात कार्यरत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी फक्त रॉक सारखा दिसत नाही तर माझ्या आत थोडासा विन डीजलदेखील आहे. म्हणजेच मी दोघांसारखा थोडा थोडा दिसतो.” असं तो म्हणाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dwayne johnson lookalike police officer viral photo the rock give epic reaction kpw