The Rock ने गाठला Milestone… केला यापूर्वी कोणालाही न जमलेला विक्रम

The Champ Is Here: सुपरस्टार ड्वेन जॉन्सनचा अनोखा विक्रम

ड्वेन जॉन्सन हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. रुपेरी पडद्यावर धमाकेदार अॅक्शनसीन करुन प्रेक्षकांना चकित करणारा ड्वेन चित्रपटांसोबतच आता सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. फोटो, व्हिडीओ, पॉडकास्ट आणि ट्विटच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. लक्षवेधी बाब म्हणजे चाहत्यांसाठी सतत ऑनलाईन राहणाऱ्या हॉलिवूड सुपरस्टारने इन्स्टाग्रामवर तब्बल २० कोटी फॉलोअर्स गोळा केले आहेत. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर इतके जास्त फॉलोअर्स गोळा करणारा तो पहिला अमेरिकन नागरिक ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

Here’s what I’ve learned these past few weeks and maybe, you can find value in this take away and apply it to your own life. Always speak your truth. And when you do speak your truth – do your best to speak with dignity, compassion, respect, poise and empathy. Even when the conversations get uncomfortable – when you approach with respect and care – on the other side of discomfort – is clarity and progress. THANK YOU, THANK YOU, THANK YOU for giving me the space to speak my truth. You have my word, I’ll always do my best to speak my truth with dignity, respect, empathy and GRATITUDE. That’s my lesson I’ve learned. And the result of speaking my truth is I was just informed, I’ve surged past and blown by 200 MILLION FOLLOWERS on Instagram and over 300 MILLION FOLLOWERS across all platforms – officially becoming/ The #1 followed man in America. The #1 followed American man in the world. And most importantly, the #1 daddy at home. Love you guys, I always got your back and let’s keep rockin’ #speakyourtruth #dignityrespectgratitude #thatsoursuperpower 

A post shared by therock (@therock) on

ड्वेन जॉन्सन उर्फ WWE सुपरस्टार रॉक याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. “खरं बोलण्यासाठी इतकं प्रभावी माध्यम दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मी वचन देतो यापुढे देखील सन्मान, दया, आणि कृतज्ञता राखुनच मी तुमच्यापुढे उपस्थित राहिन. आता आपलं फॉलोअर्सचं कुटुंब २० कोटींच्या घरात पोहोचलं आहे. अधिकृतरित्या मी सर्वाधिक फॉलो केला जाणारा अमेरिकन नागरिक ठरलो आहे. पण मला या विक्रमाचं फारसं कौतुक वाटत नाही. तुम्ही माझ्यासोबत आहात हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे.” अशा आशयाचं संभाषण करत ड्वेनने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dwayne johnson surpasses 200 million instagram followers mppg

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या