मनी लाँड्रिंग प्रकरणात नवीन खुलासा; सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीला लक्झरी कार भेट दिल्याचा EDला संशय

ईडीला संशय आहे की बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखर यांनी बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती

ED suspects Sukesh Chandrasekhar gifted luxury car to Nora Fatehi
(Photo: abujanisandeepkhosla/ Instagram)

अंमलबजावणी संचालनालय आरोपी सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात सातत्याने तपास करत आहे, ज्यात दररोज नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांची तासन्तास चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता या प्रकरणाच्या तपासात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. २०० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसला एक मोठी लक्झरी कार गिफ्ट केल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर दोन्ही अभिनेत्रींना बंगले गिफ्ट करण्याची तयारीही केली जात होती.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ईडीला संशय आहे की बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखर यांनी बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती. नोरा फतेहीने मुंबईतील शोरूममधून कार घेऊन जात असल्याचे व्हिज्युअल्सही समोर आले होते.

ईडीने सात ऑक्टोबर रोजी नोरा फतेहीचा जबाब नोंदवला, ज्या दरम्यान तपासकर्त्यांना २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या भेटीबद्दल कळले. ईडीला संशय आहे की एक कोटीहून अधिक किमतीची कार सुकेशने नोरा फतेहीला गिफ्ट केली होती जे त्याने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून घेतले होते.

चौकशीच्या दिवशी भेटवस्तूंचा उल्लेख केला गेला, तेव्हा नोराला सुकेशच्या समोर बसवले गेले आणि नंतर प्रश्नांची उत्तरे दिली गेली. चौकशी दरम्यान नोराने सांगितले की २०२० मध्ये ती एका कार्यक्रमाला गेली होती. त्या कार्यक्रमात त्याला सुकेशची पत्नी आणि अभिनेत्री लीना पॉलने बोलावले होते. हा कार्यक्रम चेन्नई येथे झाला होता.

आता ईडीला संशय आहे की सुकेशने नोरा फतेहीला दिलेल्या कारचे पैसे खंडणीच्या रॅकेटद्वारे कमावले होते. हे तेच पैसे होते जे त्याने व्यावसायिकाच्या पत्नीला ब्लॅकमेल करून गोळा केले होते. अशा परिस्थितीत, ईडी आता या भेटीची देखील चौकशी करत आहे आणि ती कोणत्या पैशाने खरेदी केली गेली याचीही चौकशी करत आहे.

नोराशिवाय ईडीने जॅकलीनचीही चौकशी केली आहे. त्यानंतर सांगण्यात आले की, सुकेश आपली ओळख बदलून जॅकलीनशी बोलत असे. या प्रकरणात जॅकलिन आणि नोरा दोघेही स्वतःला निर्दोष म्हणत आहेत. त्यांच्या मते, त्यांना या वसुली रॅकेटबद्दल काहीच माहिती नव्हती. पण ईडी त्यांच्यामार्फत अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ed suspects sukesh chandrasekhar gifted luxury car to nora fatehi abn

ताज्या बातम्या