फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध निर्माती

बऱ्याच वेळा ती सोशल मीडियावर चर्चेत असते

सध्याच्या काळात एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी इन्स्टाग्राम, ट्विटर या सारख्या सोशल माध्यमांच्या सहाय्याने चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बऱ्याच वेळा ही सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियावर त्यांच्या जीवनातील अनेक रंजक किस्से, फोटो किंवा व्हिडीओ शेअर करुन त्यांच्या जीवनातील काही गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. यात बऱ्याच वेळा हे सेलिब्रिटी त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. यात सध्या टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरच्या लहानपणीच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

छोट्या पडद्यावरील एकाहून एक उत्तम मालिकांची निर्मिती करत एकता कपूर घराघरात पोहोचली. ‘क्यूँ कि सांस भी कभी बहु थी’, ‘नागिन’ या मालिकांच्या माध्यमातून एकताला अफाट लोकप्रियता मिळाली. त्यामुळे बऱ्याच वेळा ती सोशल मीडियावर चर्चेत असते. आज एकताचा वाढदिवस. त्यामुळे तिच्याविषयी चाहत्यांमध्ये बरीच चर्चा होत आहे. यात तिच्या लहानपणीच्या फोटोची तुफान चर्चा रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

The birds look more scared than me … or do I! My dads hand of course is providing emotional support … like always

A post shared by Erkrek (@ektarkapoor) on

एकता काही काळापूर्वी इन्स्टाग्रामवर तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती प्रचंड गोड दिसत आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात काही धान्य असून ते धान्य कबूतर खाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये एकता प्रचंड वेगळी दिसत असून तिला ओळखणं कठीण असल्याचं दिसून येत आहे.

वाचा : ‘मला म्हातारी म्हणता, पण…’; अर्चना पूरण सिंग झाली भावूक

दरम्यान, कलाविश्वातील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या दिग्दर्शक, निर्मात्यांमध्ये एकता कपूरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. एकताने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांची निर्मिती केली असून काही बॉलिवूड चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. तसंच आता तिने तिचं लक्ष डिजिटल प्लॅटफॉर्मच्या दिशेने वळविल्याचं दिसून येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ekta kapoor birthday special childhood photos of television queen ssj

ताज्या बातम्या