scorecardresearch

“आमिर खान कधीच बॉयकॉट होऊ शकत नाही कारण…” ‘लाल सिंग चड्ढा’बाबत स्पष्टच बोलली एकता कपूर

‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’बाबत एकता कपूरने आपलं मत व्यक्त केलं आहे.

“आमिर खान कधीच बॉयकॉट होऊ शकत नाही कारण…” ‘लाल सिंग चड्ढा’बाबत स्पष्टच बोलली एकता कपूर
'बॉयकॉट लाल सिंग चड्ढा'बाबत एकता कपूरने आपलं मत व्यक्त केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ११ ऑगस्टला आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती. शिवाय चित्रपट पाहण्यासाठी देखील त्याने प्रेक्षकांना आवाहन केलं. आता कलाक्षेत्रातील मंडळी बॉयकॉट ट्रेंडबाबत आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे आमिर खान निराश, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

‘लाल सिंग चड्ढा’मुळे आमिरला मात्र मोठा धक्का बसला आहे. अशा अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. यामध्येच आता एकता कपूरने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकता कपूरला ‘लाल सिंग चड्ढा’ बॉयकॉट होण्यामागचं कारण विचारण्यात आलं. यावेळी तिने आमिरला पूर्ण पाठिंब असल्याचं देखील म्हटलं.

एकता म्हणाली, “ज्यांनी चित्रपटसृष्टीला अधिक व्यवसाय दिला अशा व्यक्तींवरच बहिष्कार टाकला जात आहे ही किती विचित्र गोष्ट आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे सगळे खान आणि खासकरून आमिर खान दिग्गज व्यक्ती आहे. आपण त्यांना बॉयकॉट करू शकत नाही. आमिर खान कधीच बॉयकॉट होऊ शकत नाही.”

आणखी वाचा – Video : “माझे स्तन तापसीपेक्षा…” अनुराग कश्यपचं ‘ते’ विधान चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉयकॉट हा ट्रेंड आणि आमिर खानवर बहिष्कार टाकणं योग्य नसल्याचं एकता कपूरचं स्पष्ट मत आहे. एकता कपूरचा अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘दोबारा’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तापसी पन्नू या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करताना दिसेल. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या