मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ‘द नाइट मॅनेजर’ या वेबमालिकेला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२४साठी नाट्य मालिका या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. ‘इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अॅण्ड सायन्सेस’ने गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये जाहीर केलेल्या नामांकनांतील १४ विविध श्रेणींमधील कलाकृतींमध्ये ‘द नाइट मॅनेजर’ या एकमेव भारतीय वेबमालिकेला नामांकन मिळाले आहे.

संदीप मोदी आणि प्रियांका घोष दिग्दर्शित ‘द नाइट मॅनेजर’ ही वेबमालिका जॉन ले कॅरे या ब्रिटिश लेखकाच्या १९९३ साली लिहिलेल्या कादंबरीवर आधारित असून ‘द नाइट मॅनेजर’ या ब्रिटिश वेबमालिकेचे हिंदी रूपांतर आहे. ज्यामध्ये टॉम हिडलस्टन, ह्यू लॉरी आणि ऑलिव्हिया कोलमन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Bigg Boss Marathi Jahnavi Killekar And Suraj Chavan
सूरजकडे भाऊबीजेला नाही गेलीस? जान्हवी किल्लेकरच्या फोटोवर चाहत्याची कमेंट, अभिनेत्री म्हणाली…
savlyachi Janu Savali fame veena jagtap gift to megha dhade
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल
Tara Bhawalkar, Tara Bhawalkar latest news,
‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’
billy zane going to play Marlon Brando role
‘टायटॅनिक’फेम अभिनेता बिली झेनचा नव्या सिनेमातील लूक पाहून चाहते झाले चकित; म्हणाले, “ऑस्कर नामांकन…”
Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी
mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul little brother first Diwali 2024 watch video
Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावाचा दिवाळीचा पहिला दिवस ‘असा’ केला साजरा, पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>>१४ दिवसांत घराबाहेर आलेल्या संग्राम चौगुलेची पहिली पोस्ट! Bigg Boss Marathi च्या प्रवासाबद्दल म्हणाला…

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२४ साठी ‘द नाइट मॅनेजर’ या वेबमालिकेची निवड होणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या ४५ वर्षांच्या कारकीर्दीत मी साकारलेले हे १४०वे पात्र आहे. यापूर्वी ह्यू लॉरी याने हे पात्र साकारले होते. त्यामुळे हे पात्र साकारताना थोडे दडपण नक्कीच होते, पण या वेबमालिकेसाठी लाभलेली दिग्दर्शक द्वयी संदीप मोदी आणि प्रियांका घोष यांची मांडणी आणि निर्माते म्हणूनही संदीप मोदी यांनी घेतलेली मेहनत यांच्यामुळे या वेबमालिकेला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२४चे नामांकन मिळाले आहे, अशी भावना अभिनेते अनिल कपूर यांनी व्यक्त केली.

न्यूयॉर्कमध्ये २५ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे निवेदन भारतीय विनोदी कलाकार वीर दास करणार आहे. वीर दासला गेल्या वर्षी स्टँड-अप स्पेशल लँडिंग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. भारतासह यावर्षी ब्राझील, तुर्की, फ्रान्स, यूके, कोरिया, सिंगापूर, थायलंड आदी देशांतील उत्तम कलाकृतींना एमी पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.