अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये ७४ व्या एमी पुरस्कार सोहळ्याचे (Emmy Awards २०२२ ) आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अमेरिकेतील एनबीसी आणि पीकॉक टीव्हीवर करण्यात आले. या सोहळ्यात टी.व्ही शोज, कलाकार, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञांना सम्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याला विशेष महत्व आहे. भारतात अनेक आठवडे ट्रेन्डिंगमध्ये असलेल्या ‘स्क्विड गेम’,’स्ट्रेंजर थिंग्ज’,’ओजार्क’ यांना तब्बल १४ नामांकनं विविध विभागात मिळाली होती. स्क्विड गेमचा दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युकने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा किताब जिंकला आहे.

पुरस्काराचे मानकरी ठरलेले :

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

1.अभिनेत्री झेंडायाला ‘युफोरिया’ या ड्रामा सिरीजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा एमी पुरस्कार मिळाला.

2.अभिनेत्री जीन स्मार्टला कॉमेडी सीरिज ‘हॅक्स’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

3.कोरियन ड्रामा सीरिज ‘स्क्विड गेम’साठी अभिनेता ली जंग जे याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

4.ह्वांग डोंग-ह्युक यांना ‘स्क्विड गेम’ या ड्रामा सिरीजच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी एमी पुरस्कार मिळाला.

‘5.व्हाईट लोटस’ला ‘बेस्ट लिमिटेड ऑर अँथॉलॉजी’ विभागात सर्वोत्कृष्ट सिरीजचा पुरस्कार मिळाला.’टेड लासो’ला सर्वोत्कृष्ट विनोदी सिरीजसाठी एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ब्रह्मास्त्र’च्या कमाईत कसलाही अडथळा येऊ नये यासाठी मल्टिप्लेक्स असोसिएशनने घेतला मोठा निर्णय

उत्कृष्ट ड्रामा सिरीज :

बेटर कॉल साउल
यूफोरिया
ओजार्क
सेवरेंस
स्क्विड गेम
स्ट्रेंजर थिंग्स
सक्सेशन- विजेती
येलोजैकेट्स

इतर विजेते :

सर्वोत्कृष्ट अभिनेता, मर्यादित मालिका आणि टीव्ही चित्रपट – मायकेल कीटन-डोपेसिक
सहाय्यक अभिनेत्री, विनोदी – शेरिल ली राल्फ-अॅबॉट एलिमेंटरी
सहाय्यक अभिनेता, विनोदी – ब्रेट गोल्डस्टीन-टेड लासो
सहाय्यक अभिनेत्री, ड्रामा – ज्युलिया गार्नर-ओझार्क
सहाय्यक अभिनेता, ड्रामा – मॅथ्यू मॅकफॅडियन – यश
सहाय्यक अभिनेत्री, मर्यादित मालिका/चित्रपट -जेनिफर कूलिज-द व्हाईट लोटस
सहाय्यक अभिनेता, मर्यादित मालिका/चित्रपट -मरे बार्टलेट-द व्हाईट लोटस
व्हरायटी टॉक सिरीज – लास्ट वीक टुनाइट विथ जॉन ऑलिव्हर
व्हरायटी स्केच मालिका – “सॅटर्डे नाईट लाइव्ह”

(HBO)
उत्कृष्ट लेखन स्पेशल, प्री-रेकॉर्डेड – “अॅडेल वन नाईट ओन्ली” (CBS)
उत्कृष्ट व्हरायटी स्पेशल – “द सुपर बाउल LVI हाफटाइम शो” (NBC)

‘स्क्विड गेम: द चॅलेंज’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांमध्ये या वेबसिरीजची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली. ही कोरिअन वेबसिरीज आता एमी पुरस्कारांच्या यादीत सामिल झाली आहे. नेटफ्लिक्सवरील ही सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीज ठरली आहे. तसेच नामांकन यादीमध्ये ‘सक्सेशन’ २५ या ड्रामा सिरीजला वेगवेगळ्या श्रेणींमध्ये समावेश करण्यात आला होता आणि आता ‘सक्सेशन’ ला सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीज एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.