scorecardresearch

…अन् भर कॉन्सर्टमध्ये चाहतीने दिग्गज गायकाला केलं Kiss; व्हिडिओ तुफान व्हायरल

शेवटी एनरिकला स्टेजवरून पळ काढावा लागला.

…अन् भर कॉन्सर्टमध्ये चाहतीने दिग्गज गायकाला केलं Kiss; व्हिडिओ तुफान व्हायरल
चाहतीने एनरिकला स्टेजवर केलं किस

हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक एनरिक इग्लेसियसचा एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याच्या एका महिला चाहतीला किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ स्वतः एनरिकने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. याशिवाय एनरिकने चाहतीला किस करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आमच्या बाळाचे नाव आहे…, सोनम कपूर-आनंद आहुजाने जाहीर केलं मुलाचं नाव

व्हिडीओमध्ये असं दिसतंय की एनरिकची एक चाहती त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर येते. यावेळी एनरिकने तिच्या गालावर किस केले. त्यानंतर ती मुलगी एनरिकला धरून त्याच्या गालावर किस करते आणि अचानक त्याच्या ओठांचे किस घेऊ लागते. असं करतानाही ती एनरिकबरोबर सेल्फी काढते. त्यानंतर एनरिक स्वत:ची तिच्यापासून सुटका करून तिथून पळून जातो. या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

केबीसीमध्ये स्पर्धक असं काही बोलली की बिग बींनी नाराज होत सोडली खुर्ची; नेमकं काय घडलं?

एनरिकने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडीओ शुक्रवारी रात्री LASSVEGAS चा असल्याचं सांगितलं. यासह त्याने त्याच्या पुढील कॉन्सर्टची माहितीही दिली. एनरिकच्या या फोटोवर त्याचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, एनरिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तो मागील २० वर्षांपासून माजी टेनिसपटू अॅना कोर्निकोवाबरोबर रिलेशनशिपमध्ये असून त्यांना तीन मुलं आहेत. दोघंही २००१ पासून एकत्र आहेत आणि ते एक मुलगा आणि दोन मुलींचे पालक आहेत. स्वतःची पार्टनर असूनही भर कॉन्सर्टमध्ये एनरिकने चाहतीला किस केल्याने त्याला ट्रोल केलं जातंय.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Enrique iglesias kisses fan on stage in concert kissing video viral hrc