scorecardresearch
Live

Entertainment Latest Live News : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Trending Entertainment News Updates 24 May : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Top Entertainment News Headlines , Entertainment News Live
Trending Entertainment News Live Updates 24 May

Manoranjan News Live Updates : दिग्दर्शक करण जोहरने ‘जुग जुग जियो’ चित्रपटासाठी गाणं चोरी केल्याचा आरोप पाकिस्तानी गायकाने केला. त्यावर टी-सीरिजने प्रत्युत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमधील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. दाक्षिणात्य कलाकार समांथा आणि विजय देवरकोंडाला चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Live Updates
18:41 (IST) 24 May 2022
मृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का?

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मृणाल दुसानीस ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेतून मृणाल घरा घरात पोहोचली. मृणालने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या काही दिवसांपासून मृणालने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता. काही महिन्यांपूर्वीच मृणाल आई झाली असून नुकतीच तिने तिच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

17:50 (IST) 24 May 2022
Inside Photos: शाहरुख खानच्या लेकीच्या वाढदिवसाचे धमाकेदार सेलिब्रेशन

या सेलिब्रेशनचे काही फोटो सुहानाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

पाहा फोटो

17:35 (IST) 24 May 2022
Photos: सनी लिओनी ते शहनाझ गिल; Bigg Boss मुळे चमकलं या प्रसिद्ध अभिनेत्रींचं नशीब!

हिना खानपासून शहनाझ गिल आणि सनी लिओनीपर्यंत अनेक अभिनेत्रींचं नशीब बिग बॉस रिअलिटी शोमुळे चमकलं आहे. या शोमध्ये सहभागी होणं या अभिनेत्रींसाठी लकी ठरलं.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

16:38 (IST) 24 May 2022
Photos : अजय देवगणच्या लेकीचा आजवरचा सर्वात बोल्ड लूक, इतर स्टारकिडलाही टाकलं मागे

अभिनेता अजय देवगणची लेक न्यासा देवगण कॅमेऱ्यापासून दूर राहण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर देखील ती फारशी सक्रिय नाही. पण आता तिचा सगळ्यात बोल्ड लूक समोर आला आहे. न्यासाच्या या लूकचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

16:37 (IST) 24 May 2022
Photos : “मी टक्कल केलंच नाही पण…”, ‘रानबाजार’ फेम माधुरी पवारने सांगितलं व्हायरल फोटोंमागचं खरं सत्य

अभिनेत्री माधुरी पवार सध्या ‘रानबाजार’ या मराठी वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तिची या वेबसीरिजमधील भूमिका प्रचंड गाजत आहे. या वेबसीरिजमधील भूमिकेसाठी तिने खरंच टक्कल केलं का? तिने या सीरिजसाठी किती मेहनत घेतली? हे आपण जाणून घेणार आहोत.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

13:52 (IST) 24 May 2022
ऐश्वर्या रायच्या आईचे वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन, फोटो शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची आई वृंदा राय यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे. नुकतंच ऐश्वर्याने तिच्या आईचा एक गोड फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा सर्व फोटो

13:51 (IST) 24 May 2022
अभिमानास्पद! अभिनेता नावझुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नवाजनं बरेच सुपरहिट चित्रपट दिलेत आणि त्यासाठी त्याला पुरस्कार देखील मिळाले आहेत. पण आता त्याच्या पुरस्करांच्या यादीत आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. नुकतंच नवाजुद्दीन सिद्दीकीला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्याला ग्रॅमी अवॉर्ड विजेता अभिनेता विंसेंट डी पॉल यांच्या हस्ते देण्यात आला.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:49 (IST) 24 May 2022
‘तारक मेहता…’ मालिकेत परतण्यासाठी दयाबेन सज्ज, निर्माते म्हणाले “आम्ही योग्य वेळेची…”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी ही लवकरच कमबॅक करणार आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी चाहत्यांना याबाबतची खूशखबर दिली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:43 (IST) 24 May 2022
Loksatta Exclusive : “आपल्याकडे दिसण्यावरच सगळं चालतं म्हणूनच…” प्रवीण तरडेंनीं सांगितलं सिनेसृष्टीचं कटू सत्य

दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. त्याचबरोबरीने त्यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट ही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याचनिमित्त प्रवीण तरडे आणि या चित्रपटाच्या टीमने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. यावेळी ते अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलत होते.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:29 (IST) 24 May 2022
Photos: ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील कलाकारांनी हापूस आंब्यावर मारला ताव; फोटो व्हायरल

या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.

फोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

13:28 (IST) 24 May 2022
Photos: हृता दुर्गुळेच्या हनिमूनची चर्चा; नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

पाहा फोटो

13:27 (IST) 24 May 2022
Photos: ‘महाराणी सोयराबाई’….’सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील अभिनेत्री श्रुती मराठेचा फर्स्ट लूक पाहिलात का?

लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

फोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

12:31 (IST) 24 May 2022
Video : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक

माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘हम आपके हैं कौन’ २८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट बराच हिट ठरला होता. सुरज बडजात्या यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या व्यक्तिरिक्त मराठमोळा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चाहते भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:11 (IST) 24 May 2022
करण जोहरवर केलेले आरोप खोटे, टी-सीरिजनेच पाकिस्तानी गायकाची केली बोलती बंद

दिग्दर्शक करण जोहरच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटामधील ‘नाच पंजाबन’ हे गाणं एका पाकिस्तानी गाण्याचं कॉपी वर्जन आहे असं म्हणत पाकिस्तानी गायक अबरार उल हकने याबाबत एक ट्विट करत करणवर आरोप केले होते. पण टी-सीरिजनेच आता ट्विट करत या पाकिस्तानी गायकाची बोलती बंद केली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:10 (IST) 24 May 2022
VIDEO : “तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तर ती विविध व्हिडीओ शेअर करत असते. क्रांती तसेच तिचे पती अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे नेहमीच चर्चेत असतात. क्रांतीने आता देखील समीर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:06 (IST) 24 May 2022
समांथा आणि विजय देवरकोंडाला शूटींगदरम्यान गंभीर दुखापत

समांथा आणि विजय देवरकोंडा याच्यासोबत काश्मीरमध्ये ‘कुशी’ या चित्रपटाचे शूटींग करताना दिसत आहे. मात्र या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात त्या दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याचे बोललं जात आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Web Title: Entertainment breaking updates bollywood trending news celebrity gossips photos videos movie review in marathi 24 may