scorecardresearch

Entertainment News : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Entertainment Latest News Today : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Entertainment Live News Updates
Trending Entertainment News Today 23 june 2022

Entertainment Breaking News Updates : मनोरंजन विश्वामध्ये सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलेलं असताना कलाविश्वातील मंडळी याबाबत आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत. अभिनेता किरण माने, सुमीत राघवन, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे अभिनेता सुनील शेट्टीचा धारावीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच अन्नू कपूर यांना फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये काही चोरट्यांनी लुटलं आहे. अन्नू कपूर यांनी या अनुभवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Live Updates
16:28 (IST) 23 Jun 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकून ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याच्या आईला अश्रू अनावर, शेअर केला व्हिडीओ

महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी २२ जून रोजी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ‘बिग बॉस’ फेम अभिनेता शिव ठाकरेच्या आईला तर मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकून अश्रू अनावर झाले.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

14:58 (IST) 23 Jun 2022
“काय मग बघताय ना ‘रानबाजार’”; राजकीय परिस्थिती पाहता तेजस्विनीने शेअर केला ‘रानबाजार’चा ‘तो’ सीन

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत. राजकीय विश्वात सुरु असलेला संघर्ष पाहता अनेकांनी याबाबत व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं चक्क महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती पाहता ‘रानबाजार’ वेबसीरिजमधील एका सीनचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

14:55 (IST) 23 Jun 2022
सुष्मिता सेनचा भाऊ लग्नानंतर ३ वर्षांतच घेणार घटस्फोट, मुलीच्या जन्मानंतर पती-पत्नीमध्ये दुरावा?

अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने (Rajeev Sen) २०१९मध्ये अभिनेत्री चारु असोपा (Charu Asopa) हिच्याशी लग्न केलं. अगदी थाटामाटात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. आता राजीव-चारु लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनी हा निर्णय का घेतला? हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:59 (IST) 23 Jun 2022

Photos : ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा अभिनेता सोशल मीडियावर चर्चेत; जाणून घ्या त्याच्याबद्दल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होताना दिसत आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दाते सोशल मीडियावर चर्चेत आहे.

फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

12:34 (IST) 23 Jun 2022
Photos: ‘अल्लू अर्जुन ते समांथा’; दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे Nick Name माहिती आहे का?

बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रस्थही गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे. कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहेमीच उत्सुक असतात.

पाहा फोटो

12:24 (IST) 23 Jun 2022
VIDEO : धारावीच्या गल्लीत फिरणाऱ्या सुनील शेट्टीचं नेटकऱ्यांना कौतुक, म्हणाले, “याला बॉडीगार्डची गरजच नाही कारण…”

अभिनेता सुनील शेट्टीने कलाक्षेत्राला दिलेलं योगदान फार मोठं आहे. सुनील शेट्टीने अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील त्याचा लूक पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत. तसेच त्याच्या शरीरयष्टीचं नेटकऱ्यांनी भरभरुन कौतुक केलं आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Web Title: Entertainment live updates annu kapoor suniel shetty prajakta mali breaking news today 23 june

ताज्या बातम्या