Live

Trending Entertainment News Live : महाराष्ट्रातील राजकारणावर हेमांगी कवीची पोस्ट ते पलक तिवारीचा बॉयफ्रेंड, मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Entertainment News Live Updates : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच क्लिकवर पाहू शकता.

Entertainment News Live Updates
Top Entertainment News Today 24 June 2022

Entertainment Breaking News Updates : सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची चर्चा देशभरात होताना दिसतेय. अगदी मराठी सिनेसृष्टी आणि बॉलिवूड कलाकारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यात अभिनेत्री हेमांगी कवीचा देखील समावेश आहे. नुकतीच हेमांगी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’ असं हेमांगीनं म्हटलं आहे. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. इब्राहिम अली खाननंतर आता पलक तिवारीचं नाव ‘द आर्चीज’ फेम वेदांग रैनाशी जोडलं जात आहे.

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Live Updates

Entertainment News Live Updates: मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

12:05 (IST) 24 Jun 2022
प्राजक्ता माळीने शेअर केला मुक्ता बर्वेसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली “तुझ्याबरोबर…”

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या प्राजक्ताकडे बरेच प्रोजेक्ट असून सातत्यानं ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याचे अपडेट देत असते. अलिकडेच प्रदिर्शित झालेली ‘रानबाजार’ ही तिची वेब सीरिज बरीच गाजली होती. त्यानंतर आता लवकरच ती ‘वाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्राजक्तासोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा असतानाच प्राजक्तानं मुक्तासोबत काम करण्याचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

12:04 (IST) 24 Jun 2022
मिका सिंगच्या स्वयंवरमध्ये मराठमोळ्या विनोदी कलाकाराची मुलगी होणार सहभागी

सुप्रसिद्ध गायक मिका सिंगच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याने आजवर अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. त्याची गाणी अगदी थिरकायला लावणारी असतात. आपल्या कामामुळे मिका हा सतत चर्चेत असतो. त्याशिवाय मिकाचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असते. लवकरच मिका सिंग हा विवाहबंधनात अडकणार आहे. स्टार भारत या वाहिनीवर ‘स्वयंवर मिका दी वोटी’ नव्या रिअॅलिटी शो सुरु झाला आहे. या स्वयंवरमध्ये १२ जणी सहभागी होणार आहेत. ‘स्वयंवर मिका दी वोटी’ या कार्यक्रमात एका मराठमोळ्या अभिनेत्याची मुलगी देखील सहभागी होणार आहे. त्यामुळे त्याच्या स्वंयवरची जोरदार चर्चा रंगली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

11:59 (IST) 24 Jun 2022
इब्राहिम अली खान नाही तर ‘हा’ अभिनेता आहे श्वेता तिवारीच्या लेकीचा बॉयफ्रेंड!

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘बिजली बिजली’ या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पलकचं हे गाणं सोशल मीडियावर खूप हीट झालं होतं. पण याशिवाय ती काही वेळा इब्राहिम अली खानसोबत स्पॉट झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चा झाल्या होत्या. पण आता मात्र पलकचं नाव इब्राहिम नाही तर दुसऱ्या एका अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे. हा अभिनेता लवकरच सुहाना खान आणि खुशी कपूर यांच्यासोबत ‘द आर्चीज’मध्ये दिसणार आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

11:58 (IST) 24 Jun 2022
“आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकासआघाडी सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. पण अद्याप त्यांना यश येत नसल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे गुवाहाटी येथे शिवसेनेच्या सर्व बंडखोर शिवसेना आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात भलताच पेच निर्माण झाला आहे. यावर विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री हेमांगी कवी हिने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच क्लिकवर

Web Title: Entertainment live updates trending bollywood big breaking marathi actors and actress news manoranjan batmya 24 june

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी