scorecardresearch

Entertainment News : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Manoranjan News Updates, 20 May : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Entertainment News Updates : सध्या सर्वत्र कान्स फिल्म फेस्टिव्हल धामधूम पाहायला मिळत आहे. बॉलिवूडसह अनेक अभिनेत्रींचा रेड कार्पेटवर जलवा पाहायला मिळत आहे. तर प्रसिद्ध गायक सोनू निगमने नवरात्रीत मटण बंदी कशाला? असे वक्तव्य केले आहे. त्याच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावरुन त्याला ट्रोल केले जात आहे. त्यासोबत रानबाजार या मराठी वेबसीरीजची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यातील बोल्ड सीनमुळे ही सीरीज चर्चेत आली आहे.

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Live Updates
19:19 (IST) 20 May 2022
“ते सगळं फक्त प्रमोशनसाठी नव्हतं…” सारासोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला कार्तिक आर्यन

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याचा चित्रपट ‘भूल भुलैय्या २’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता कार्तिक आर्यननं एका मुलाखतीत सारा अली खान आणि त्याच्या नात्यावर मौन सोडलं आहे. मागच्या २ वर्षांपासून कार्तिक आणि साराच्या चाहत्यांना ज्याची उत्सुकता होती त्याचं उत्तर अखेर कार्तिकनं या मुलाखतीत दिलं आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

18:08 (IST) 20 May 2022
Loksatta Exclusive: “सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या पत्नीची इतिहासात नोंदच नाही” प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत

चित्रपटाची तयारी करत असताना प्रवीण तरडे जेव्हा हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीचं नाव शोधत होते. तेव्हा त्यांना काय अनुभव आला आणि इतिहासात हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीच्या नावाची नोंद नसताना मग चित्रपटात त्यांना नाव कसं देण्यात आलं याचा किस्सा प्रवीण तरडे यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

17:56 (IST) 20 May 2022

Photos: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांची ‘प्रवाह पिक्चर’ वाहिनीच्या प्रमोशनसाठी हजेरी; स्टायलिश लूकची सर्वत्र चर्चा

मराठी चित्रपट वाहिनीत असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.

फोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

17:44 (IST) 20 May 2022

Cannes 2022: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पहिल्यांदा अवतरली रेड कार्पेटवर

७५व्या कान्स चित्रपट महोत्सवाला १७ मे पासून सुरुवात झाली आहे.

पाहा फोटो

17:42 (IST) 20 May 2022

Photos: महाराष्ट्र खदखदून हसणार कारण २२ तारखेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’…

अल्पावधीत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आता नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे.

फोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

17:40 (IST) 20 May 2022

Photos: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका लवकरच अडकणार विवाहबंधनात; मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल

‘बेबी डॉल’ या सुपरहिट गाण्याने रातोरात प्रसिद्ध झालेली बॉलिवूडमधील गायिका कनिका कपूर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

पाहा फोटो

17:10 (IST) 20 May 2022
‘भिरकीट’ चित्रपटाचं गाणं ‘लाईन दे मला’ प्रदर्शित, तानाजी गालगुंडेचा डॅशिंग लुक चर्चेत

‘लाईन दे मला’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गाण्यात मोनालिसा बागल आणि तानाजी गालगुंडे यांच्या प्रेमकहाणी सोबतच रोमँटिक डान्सही पाहायला मिळत आहे. या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याचे बोल नकास अजीज ,आनंदी जोशी यांचे आहेत.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

16:42 (IST) 20 May 2022
आर. माधवनने केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, म्हणाला “हा नवीन भारत…”

कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या अभिनेता आर माधवन याने देशातील सूक्ष्म अर्थव्यवस्थेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. आर माधवनचा हा व्हिडीओ केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

16:40 (IST) 20 May 2022
‘कोण होणार करोडपती’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, तारीखही ठरली

येत्या ६ जूनपासून सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी मिळणार आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

16:28 (IST) 20 May 2022
‘…अन् बाकी सगळे कोमात’ वल्ली आणि माई मावशीचा धम्माल व्हिडीओ पाहिलात का?

‘तू तेव्हा तशी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची जोडी आणि त्यांच्या फुलणार प्रेम तर प्रेक्षकांना आवडतंच आहे. पण त्याच सोबत या मालिकेत एक जोडी अशी आहे ज्यांची भांडण सतत चालू असतात ती म्हणजे माई मावशी आणि वल्ली. ऑन-स्क्रीन जरी या दोघी भांडत असल्या तरी ऑफस्क्रीन त्यांची धमाल चालू असते.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

15:54 (IST) 20 May 2022
‘धाकड’ गर्ल कंगना रणौतनं स्वतःला दिलं खास गिफ्ट, खरेदी केली महागडी कार

नुकताच कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगनाचा नेहमीपेक्षा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. अशात चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच कंगनानं स्वतःला एक खास गिफ्ट दिलं आहे. कंगना रणौतनं नवी कार खरेदी केली असून तिच्या कार कलेक्शनमध्ये आता आणखी एका महागड्या कारची भर पडली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

14:11 (IST) 20 May 2022
अमिताभ बच्चन- शाहरुख खानसह अन्य २ अभिनेत्यांच्या विरोधात खटला दाखल, वाचा नेमकं काय घडलं

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण आणि रणवीर सिंग या बॉलिवूड अभिनेत्यांच्या विरोधात बिहारच्या एका न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. हा खटला मुजफ्फरपूरमधील एक समाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी दाखल केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

14:09 (IST) 20 May 2022
थाट कान्स फेस्टिव्हलचा पण चर्चा दीपिकाच्या कानातल्यांची; युजर म्हणाले, “कशासाठी एवढा अत्याचार…”

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मुळे चर्चेत आहे. दीपिका या फेस्टिव्हलच्या ज्युरी सदस्यांच्या टीममध्ये सहभागी आहे. सोशल मीडियावर सध्या दीपिकाचे या फेस्टिव्हलमधील लुक व्हायरल होताना दिसत आहेत. खासकरून तिचा साडीतील लुक बराच चर्चेत आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:55 (IST) 20 May 2022
‘अजान’ नंतर सोनू निगमचं आणखी एक वादग्रस्त विधान, म्हणाला “नवरात्रीत मटण बंदी….”

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या क्लिपमध्ये सोनू निगमने नवरात्रीत मटण बंदी कशाला? असे वक्तव्य केले आहे. त्याच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:53 (IST) 20 May 2022
“आमचे नाते पक्के होणार होतं पण तेव्हाच…”, रितेश देशमुखने उघड केले गुपित

नुकतंच रितेशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशने अनेक वर्षांपूर्वीचे एक गुपित उघड केले आहे. रितेश देशमुखने नुकतंच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Web Title: Entertainment news live 20 may 2022 latest bollywood news movie release online movies songs celebrity gossip viral news rumours

ताज्या बातम्या