Entertainment News Updates : सध्या सर्वत्र कान्स फिल्म फेस्टिव्हल धामधूम पाहायला मिळत आहे. बॉलिवूडसह अनेक अभिनेत्रींचा रेड कार्पेटवर जलवा पाहायला मिळत आहे. तर प्रसिद्ध गायक सोनू निगमने नवरात्रीत मटण बंदी कशाला? असे वक्तव्य केले आहे. त्याच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावरुन त्याला ट्रोल केले जात आहे. त्यासोबत रानबाजार या मराठी वेबसीरीजची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यातील बोल्ड सीनमुळे ही सीरीज चर्चेत आली आहे. मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.