Entertainment News Live Updates, 27 May 2022 : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा ५० वा वाढदिवस नुकतंच पार पडला. या वाढदिवसाच्या निमित्त त्याने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या या वाढदिवसाच्या पार्टीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.