Entertainment News Live Updates 13 May : मनोरंजन क्षेत्रात सध्या सगळीकडेच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दुसरीकडे बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य सिनेमा असं काहीसं चित्र रंगलेलं पाहायला मिळत आहे. यावर सध्या अनेक सेलिब्रिटी आपली मतं मांडत आहेत. तर लवकरच हंबीररावसह अनेक नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.