Entertainment Breaking News : साई पल्लवीच्या अडचणीत वाढ ते प्रियांका चोप्राची इन्स्टाग्राम पोस्ट, मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Trending Entertainment News Updates : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर वाचू शकता.

Entertainment Live News Updates
Trending Entertainment News Today

Top Entertainment News Updates : मनोरंजन सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीचीच. साई पल्लवीने बॉलीवूड चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने नवा वाद सुरु झाला. त्यामुळे वातावरण तापले आहे आणि आता साई पल्लवीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रियांका चोप्राच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच प्रियांकाने आई मधू चोप्रा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिने मुलीची एक झलकही दाखवली आहे.

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Live Updates

Entertainment News Live Updates : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

19:18 (IST) 17 Jun 2022
Photos : WWEच्या कुस्तीपटूची ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात एण्ट्री, शरीरयष्टी पाहून तुम्हीही व्हाल थक्क

‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. तिथपासूनच या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखीन वाढली आहे. ‘ब्रम्हास्त्र’च्या ट्रेलरमध्ये WWE चा कुस्तीपटू सौरव गुर्जरही दिसत आहे. सौरवची शरीरयष्टी पाहून तुम्हीही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

18:21 (IST) 17 Jun 2022
Inside Photos : हाती काम नाही, तरीही राखी सावंतने दुबईमध्ये खरेदी केलं महागडं घर, पाहा फोटो

अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा प्रियकर व्यावसायिक आदिल खान दुर्रानी सतत चर्चेत असतात. सध्या राखीच्या हाती फार काम नाही. तरीही तिने दुबईमध्ये महागडं घर खरेदी केलं आहे. तिच्या याच घराचे फोटो आज आपण पाहणार आहोत.

संपूर्ण फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

18:12 (IST) 17 Jun 2022
आईच्या निधनानंतर पिंकी रोशन यांची भावुक पोस्ट, बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूडमध्ये सध्या एका मागोमाग एक दुःखद वार्ता ऐकायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायक ‘केके’चं निधन झालं. ज्यामुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. अशात आता अभिनेता हृतिक रोशनच्या कुटुंबातून दुःखद बातमी आली आहे. हृतिकच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं नुकतंच निधन झालं आहे. हृतिकची आजी म्हणजेच त्याच्या आईची आई पद्मा राणी यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

16:38 (IST) 17 Jun 2022
Photos : कधीही न पाहिलेला जान्हवी कपूरचा बोल्ड लूक, मनमोहक सौंदर्याचं होतंय कौतुक

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. नुकतंच तिने बोल्ड लूकमध्ये एक फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.

संपूर्ण फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

16:02 (IST) 17 Jun 2022
VIDEO : “मी लग्न करणार नाही”; बोल्ड सीन देणाऱ्या ईशा गुप्ताला नकोय लग्नाची बेडी, अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत

सर्वाधिक बोल्ड अभिनेत्रींच्या यादीमध्ये ईशा गुप्ताचं नाव टॉपला आहे. ‘आश्रम ३’ वेबसीरिजमधील बोल्ड सीनमुळे ती अधिक चर्चेत आली. ईशाचं खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. वयाची ३५शी ओलांडली तरी ईशाला लग्न करण्यात रस नसल्याचंच दिसून येत आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

15:26 (IST) 17 Jun 2022
एक्स गर्लफ्रेंड साराला पाहून कार्तिकने केले असे काही, व्हिडीओ होतोय व्हायरल

काही वर्षांपूर्वी कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या डेटिंगच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. दोघांनी एकत्र काम केलं होतं. पण नंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर आलं. दोघांनी अर्थातच यावर प्रतिक्रिया दिली नाही. पण जेव्हा ब्रेकअपनंतर दोघंही अचानक एकमेकांच्या समोर आले तेव्हा जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालं आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

13:57 (IST) 17 Jun 2022
‘शक्तिमान’ पुन्हा येतोय, भारतातील पहिल्या सुपरहिरोसाठी ३०० कोटींचा खर्च, अभिनेता म्हणतो…

नव्वदच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान’. या काळात हा कार्यक्रम न पाहणारा प्रेक्षक क्वचितच तुम्हाला सापडेल. आता पुन्हा एकदा हिच जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. पण यावेळी मालिका नव्हे तर चित्रपटाच्या माध्यमातून ‘शक्तिमान’ साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:54 (IST) 17 Jun 2022
“मला आई पाहिजे असं तो म्हणतो तेव्हा…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ गाजवणाऱ्या नम्रता संभेरावची लेकासाठी भावूक पोस्ट

कलाकारांना आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून निवांत वेळ मिळणं फारच कठीण असतं. बऱ्याचदा तर कुटुंबाला देखील वेळ देता येत नाही. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गाजवणारी अभिनेत्री नम्रता संभेरावला देखील या प्रसंगाचा सामना करावा लागला. नम्रता गरोदरपणानंतर काही दिवसांनी पुन्हा कामावर परतली. पण यादरम्यानचा काळ तिच्यासाठी कसा होता हे तिने शेअर केलं आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:52 (IST) 17 Jun 2022
मराठीमधील सगळ्यात बोल्ड चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच, ‘टकाटक २’मध्ये काय पाहायला मिळणार?

मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘टकाटक’. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘टकाटक’ मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:54 (IST) 17 Jun 2022
‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप का ठरला? दिग्दर्शक म्हणाला “या चित्रपटाला राजकीय…”

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:53 (IST) 17 Jun 2022
“या प्रवासात काही अतिशय खडतर क्षण आले पण…”, ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. या मालिकेने यशस्वीरित्या ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्ताने नुकतंच या मालिकेतील एका अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:52 (IST) 17 Jun 2022
“मी राजू शेट्टींचा खूप मोठा चाहता, त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी”, प्रवीण तरडेंनी केले कौतुक

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. सध्या सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रवीण तरडेंची खास भेट घेतली.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:51 (IST) 17 Jun 2022
आई मधू चोप्राच्या वाढदिवसानिमित्त प्रियांका चोप्राची खास पोस्ट, म्हणाली…

नुकतंच प्रियांकाने आई मधू चोप्रा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिने मुलीची एक झलकही दाखवली आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त प्रियांकाने एक खास फोटो शेअर केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:24 (IST) 17 Jun 2022

Photos : साराच्या बोल्ड फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

12:07 (IST) 17 Jun 2022
हृतिक रोशनवर कोसळला दुखःचा डोंगर, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन

बॉलिवूडमध्ये सध्या एका मागोमाग एक दुःखद वार्ता ऐकायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायक ‘केके’चं निधन झालं. ज्यामुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. अशात आता अभिनेता हृतिक रोशनच्या कुटुंबातून दुःखद बातमी आली आहे. हृतिकच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं नुकतंच निधन झालं आहे. हृतिकची आजी म्हणजेच त्याच्या आईची आई पद्मा राणी यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. पद्मा राणी यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी हृतिकचे वडिल राकेश रोशन यांनी केली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

11:28 (IST) 17 Jun 2022

Photos : सोनम कपूरच्या बेबी शॉवरमुळे चर्चेत आलेला लियो कल्याण आहे तरी कोण?

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या बेबी शॉवर कार्यक्रमातील लियो कल्याणचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोनमच्या बेबी शॉवरमुळे चर्चेत आलेल्या गायक लियो कल्याणबद्दल जाणून घेऊया.

फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

मनोरंजन क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

Web Title: Entertainment news live police complaint against sai pallavi pawankhind ajay purkar home kon honar carorpati 17 june

Next Story
‘शक्तिमान’ पुन्हा येतोय, भारतातील पहिल्या सुपरहिरोसाठी ३०० कोटींचा खर्च, अभिनेता म्हणतो…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी