Entertainment News Updates, 08 June : सध्या मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे अभिनेत्री कंगना रणौतची नूपुर शर्मा प्रकरणावरील प्रतिक्रिया. दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर भाजपनं त्यांना निलंबित केलं. मात्र कंगनानं यावर प्रतिक्रिया देताना नूपुर शर्माला पाठिंबा देत लोकशाहीवर भाष्य केलं आहे. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच ‘रामायण’ मालिकेतून प्रसिद्धी मिळालेले प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अरुण गोविल यांनी नुकतीच एक महागडी कार खरेदी केली असून. सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Live Updates

Entertainment Latest News Live : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

17:41 (IST) 8 Jun 2022
आर्चीला ‘या’ खास नावाने हाक मारतो परश्या! आकाश ठोसरची पोस्ट चर्चेत

‘सैराट’ चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले कलाकार अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे आणि सोल मीडियावर लाइव्ह सेशनच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधतात तसेच अनेकदा हे दोघंही चाहत्यांना आपल्या कामाचे आणि आगामी चित्रपटांविषयीचे अपडेट देत असतात. ‘सैराट’ चित्रपटानंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून पाहायला मिळतं. पण आकाश रिंकूला कोणत्या खास नावाने हाक मारतो याचा खुलासा त्याच्या एका पोस्टमधून झाला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:39 (IST) 8 Jun 2022
पतीपासून २७ वर्षं वेगळं राहूनही डिंपल यांनी घेतला नाही घटस्फोट, सनी देओल होता यामागचं कारण?

बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया आज ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ८ जून १९५७ रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या डिंपल यांनी बालपणापासूनचं अभिनेत्री व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी निर्माता राज कपूर यांच्या ‘बॉबी’ (१९७३) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच वर्षी त्यांनी वयाने स्वतःपेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरी बद्दल…

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:39 (IST) 8 Jun 2022
‘रामायण’ फेम अरुण गोविल यांनी खरेदी केली लग्झरी कार, चाहते म्हणाले “प्रभु कैसा वाहन ले आए”

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील प्रभु रामचंद्राच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेता अरुण गोविल सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेकदा चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. तसेच त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी देखील ते सोशल मीडियावरूनत चाहत्यांसोबत शेअर करतात. अरुण गोविल यांनी नुकतीच मर्सिडिज- बेंज खरेदी केली. ज्याचा एक छोटासा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत अरुण गोविल यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

11:44 (IST) 8 Jun 2022
शरीरयष्टीवरुन ट्रोल करणाऱ्यावर भडकला अर्जुन कपूर, गर्लफ्रेंड मलायकालाही राग अनावर, म्हणाली…

अभिनेता अर्जुन कपूर अलिकडे फिटनेससाठी अधिकाधिक मेहनत घेताना दिसतो. जवळपास दिड वर्ष तरी फिटनेससाठी मेहनत घेत त्याने वजन कमी केलं. अर्जुनला सुरुवातीपासूनच वाढत्या वजनामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण आता पुन्हा एकदा अर्जुन त्याच्या लूकमुळे चर्चेत आला आहे. एका युजरने चक्क अर्जुनच्या ट्रेनरला सोशल मीडियावर मॅसेज केला. हा मॅसेज पाहून अर्जुनला राग अनावर झाला आहे. अर्जुनला त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराने देखील पाठिंबा दिला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

11:16 (IST) 8 Jun 2022

Shilpa Shetty Birthday : आलिशान घर, करोंडोच्या गाड्या…लक्झरियस आयुष्य जगणाऱ्या शिल्पाची एकूण संपत्ती माहितीये?

९०च्या दशकात अभिनयासोबतच सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घालणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत राहिलेली शिल्पा शेट्टी करोडोंची मालकिण आहे.

फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

11:13 (IST) 8 Jun 2022
‘पीट सॅमप्रसने फेमस केलेली अर्धी चड्डी पण वीस वर्षांपूर्वी अशोक सराफने…’, सुनील गावस्करांनी सांगितला मजेशीर किस्सा

मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नुकताच त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ही यावेळी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सुनील गावस्कर यांनी अशोक सराफ यांचे काही किस्से सांगितले आहेत.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

10:43 (IST) 8 Jun 2022
“रोका, मेहंदी आणि संगीत…” लग्नाच्या चर्चांवर सोनाक्षी सिन्हानं अखेर सोडलं मौन

बॉलिवूड अभिनेत्री सोनक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल मागच्या काही काळापासून सतत्याने चर्चेत आहेत. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून सुरू होत्या. मात्र दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. पण आता सोनाक्षी सिन्हा आणि इक्बाल जहीर यांच्या नात्याचा अखेर खुलासा झाला आहे. इक्बालनं सोशल मीडियावर सोनाक्षीला ‘आय लव्ह यू’ म्हणत रिलेशनशिपच्या चर्चांना पुष्टी दिली आहे. त्यानंतर आता सोनाक्षीनं लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

09:24 (IST) 8 Jun 2022
नूपुर शर्मा प्रकरणावर कंगना रणौतची प्रतिक्रिया; म्हणाली “जेव्हा हिंदू देवतांना अपमानित केलं जातं…”

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त राजकीय मुद्द्यांवर आपलं मत मांडल्याने चर्चेत असते. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक मुद्द्यावर बिनधास्त बोलणाऱ्या कंगनानं आता देशात सर्वाधित चर्चेत असलेल्या नुपूर शर्मा प्रकरणावर भाष्य केलं आहे. राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलं होतं. या प्रकरणावर बोलताना कंगनानं नूपुर यांना पाठिंबा दिला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मनोरंजन क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर