Manoranjan News Updates, 21 May : सध्या कान्स महोत्सव २०२२ ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, हेली शाह, हिना खान यांच्या लुकची बरीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यननं पहिल्यांदा सारा अली खानसोबतच्या त्याच्या नात्यावर मौन सोडत त्यावेळी सर्व काही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नव्हतं असं म्हटलंय. याशिवाय देशात सुरू असलेल्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी विरुद्ध बॉलिवूड वादावर प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारनं प्रतिक्रिया दिली आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
Photos : ‘रानबाजार’आधी ‘या’ वेब सीरिजमधील बोल्ड सीन्समुळे तेजस्विनी पंडित आली होती चर्चेत
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित हिच्याकडे पाहिलं जातं. ‘रानबाजार’ वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिल्यामुळे तेजस्विनी पंडित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परंतु, याआधीही अनेक वेब सीरिज, मालिका आणि चित्रपटांमधून तेजस्विनीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.
फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल सध्या भलतीच चर्चेत असते. आता ती खान कुटुंबियांच्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावताना दिसते. अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी हिच्या बर्थ डे पार्टीला शहनाज उपस्थिती होती. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या ‘आश्रम ३’ वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजमध्ये ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे. पण त्याचपूर्वीच तिने इन्स्टाग्राम अकाऊंवटवरून बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत. त्यावरच एक नजर टाकूया.
आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानला जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगत आहे. १७ मेपासून सुरु झालेल्या या महोत्सवाचा २८मेला शेवटचा दिवस असणार आहे. या महोत्सवामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अमृता फडणवीस आता ७५ व्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी पोहोचल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरून याची माहिती दिली. कान्स चित्रपट महोत्सवासाठी पोहोचलेल्या अमृता फडणवीस यांचं हे ट्वीट सध्या बरंच व्हायरल झालं आहे.
अभिनेता आर माधवन सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्याचा चित्रपट ‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’चा प्रिमियर १९ मे रोजी ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती आर माधवननं स्वतःच केली आहे. कान्समधील स्क्रिनिंगनंतर या चित्रपटाला १० मिनिटांचं स्टँडिंग ऑवेशनही मिळालं.
Photos : ‘मन उडू उडू झालं…’; पाहा हृता-प्रतीकच्या रिसेप्शन सोहळ्याचे खास फोटो
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हृता दुर्गुळे १८ मे रोजी प्रतीक शाहसोबत विवाहबंधनात अडकली. हृता-प्रतीकच्या लग्नसोहळ्यातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नसोहळ्यातील रिसेप्शनचे फोटो हृताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
उत्तम भूमिकांमुळे नावारुपाला आलेली कंगना रणौत नवा कोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची गणितं काही वेगळी पाहायला मिळाली.
दाक्षिणात्य स्टार महेश बाबू, किच्चा सुदीप यांनी काही वादग्रस्त विधानं करत कलासृष्टीमध्ये वादग्रस्त वातावरण निर्माण केलं. त्यानंतर बॉलिवूडकरांनीही बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर आपलं मत मांडलं. आता अभिनेता अक्षय कुमारने देखील या वादावर आपलं मौन सोडलं आहे.