Manoranjan News: सध्या कान्स महोत्सव २०२२ ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, हेली शाह, हिना खान यांच्या लुकची बरीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. दुसरीकडे सध्या कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाची बरीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसत आहे. चित्रपटाच्या नावावरून आता नवा वाद उभा राहिला आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
‘रानाबाजार’ ही मराठी मधील सर्वाधिक बोल्ड वेबसीरिज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री माधुरी पवार देखील भलतीच भाव खाऊन गेली.
अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतीक शहा यांचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाले. आता हृता-प्रतीक हनिमून एण्जॉय करत आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना किच्चा सुदीपनं, “हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही.” असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देत अभिनेता अजय देवगणनं एक ट्वीट केलं होतं. त्यानंतर हा मुद्दाच वादाच्या भोवऱ्यात सापडला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड अशा दोन भागात अभिनय क्षेत्र विभागलं गेलं. कलाकार, राजकीय नेते यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. आता या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट हा मराठीमधील सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. हिंदी चित्रपटासाठी वापरण्यात येणारे घोडे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आले आहेत. याचबाबत प्रविण तरडे यांनी खुलासा केला आहे.
अभिनेत्री हिना खान सध्या कान्स चित्रपट महोत्सवामुळे चर्चेत आहे. तिचे या महोत्सवामधील रेड कार्पेटवरील लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हिनाचा याचदरम्यानचा एक नवा लूक समोर आला आहे.
अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगत आहे. येत्या ३ जूनला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दाखल होणार आहे. पण त्याचपूर्वी ‘पृथ्वीराज’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केली जात आहे.
सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याच्या बहिणीचा पती आयुष शर्मा देखील दिसणार होता. पण आता मात्र असं होणार नाहीये. आयुष शर्मानं ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट सोडला आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
कंगना रणौतचा ‘धाकड’ चित्रपट दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. पण प्रत्यक्षात हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला. पण ‘धाकड’ बरोबर प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैय्या २’ चित्रपट मात्र बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. याचबाबत कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचं सध्या तो जोरदार प्रमोशन करत आहे. आता त्याने चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी एक नवा पर्याय निवडला आहे.