Entertainment News: मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Entertainment News Updates 22 May : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Latest Entertainment News Live, Entertainment News Live
Manoranjan News Marathi , Bollywood News Live Updates

Manoranjan News: सध्या कान्स महोत्सव २०२२ ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, हेली शाह, हिना खान यांच्या लुकची बरीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. दुसरीकडे सध्या कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाची बरीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसत आहे. चित्रपटाच्या नावावरून आता नवा वाद उभा राहिला आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Live Updates
19:05 (IST) 22 May 2022
Photos : तेजस्विनी पंडित-प्राजक्ता माळीलाही ‘रानाबाजार’मधील ‘ती’ अभिनेत्री देते टक्कर, पहिल्यांदाच केलं वेबसीरिजमध्ये काम

‘रानाबाजार’ ही मराठी मधील सर्वाधिक बोल्ड वेबसीरिज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री माधुरी पवार देखील भलतीच भाव खाऊन गेली.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

18:02 (IST) 22 May 2022
Photos : हृता दुर्गुळे-प्रतीक शहाचा रोमँटिक अंदाज, हनिमूनचे फोटो पाहिलेत का?

अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतीक शहा यांचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाले. आता हृता-प्रतीक हनिमून एण्जॉय करत आहेत.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

15:34 (IST) 22 May 2022
भाषा वाद : PM मोदींच्या प्रतिक्रियेनंतर किच्चा सुदीप म्हणतो; “भांडण व्हावं असं…”

एका कार्यक्रमात बोलताना किच्चा सुदीपनं, “हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही.” असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देत अभिनेता अजय देवगणनं एक ट्वीट केलं होतं. त्यानंतर हा मुद्दाच वादाच्या भोवऱ्यात सापडला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड अशा दोन भागात अभिनय क्षेत्र विभागलं गेलं. कलाकार, राजकीय नेते यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. आता या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

15:22 (IST) 22 May 2022
Loksatta Exclusive : “कलाकारांपेक्षा घोड्याचा खर्च अधिक कारण…” प्रविण तरडेंनी सांगितला चित्रीकरणादरम्यानचा ‘तो’ किस्सा

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट हा मराठीमधील सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. हिंदी चित्रपटासाठी वापरण्यात येणारे घोडे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आले आहेत. याचबाबत प्रविण तरडे यांनी खुलासा केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:01 (IST) 22 May 2022
Cannes 2022 : हिना खानच्या ग्लॅमरस लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष, बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकलं मागे

अभिनेत्री हिना खान सध्या कान्स चित्रपट महोत्सवामुळे चर्चेत आहे. तिचे या महोत्सवामधील रेड कार्पेटवरील लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हिनाचा याचदरम्यानचा एक नवा लूक समोर आला आहे.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

12:58 (IST) 22 May 2022
अक्षच कुमारचा ‘पृथ्वीराज’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, चित्रपटाचं नाव बदलण्याची होतेय मागणी

अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगत आहे. येत्या ३ जूनला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दाखल होणार आहे. पण त्याचपूर्वी ‘पृथ्वीराज’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केली जात आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:38 (IST) 22 May 2022
सलमान खान- आयुष शर्मामध्ये वाद? भाईजानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’मधून अभिनेता बाहेर

सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याच्या बहिणीचा पती आयुष शर्मा देखील दिसणार होता. पण आता मात्र असं होणार नाहीये. आयुष शर्मानं ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट सोडला आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

11:43 (IST) 22 May 2022
‘धाकड’च्या अपयशानंतर कंगना रणौतने शेअर केली पोस्ट, ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाबाबत म्हणाली…

कंगना रणौतचा ‘धाकड’ चित्रपट दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. पण प्रत्यक्षात हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला. पण ‘धाकड’ बरोबर प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैय्या २’ चित्रपट मात्र बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. याचबाबत कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

11:42 (IST) 22 May 2022
आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये आमिर खान देणार चाहत्यांना सरप्राईज, क्रिकेटच्या मैदानात करणार नवा प्रयोग!

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचं सध्या तो जोरदार प्रमोशन करत आहे. आता त्याने चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी एक नवा पर्याय निवडला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Web Title: Entertainment news live updates bollywood life television news and series celebrity gossips photos videos on 22 may

Next Story
‘धाकड’च्या अपयशानंतर कंगना रणौतने शेअर केली पोस्ट, ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाबाबत म्हणाली…
फोटो गॅलरी