Entertainment News Updates, Celebrity News : सध्या महाराष्ट्रात अभिनेत्री केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टचा मुद्दा बराच गाजताना दिसत आहे. केतकी चितळेनं तिच्या फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट लिहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली होती. त्यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत तिच्यावर टीका केली होती. तर दुसरीकडे पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंहच्या गंमतीशीर विनोदामुळे अडचणीत सापडली आहे. तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यासोबतच मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ची निवड करण्यात आली आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राजचं वयाच्या २१ व्या वर्षी निधन झालं आहे. चेतनानं बंगळुरूच्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार तिचं निधन प्लॅस्टिक सर्जरीमुळे झाल्याचं बोललं जात आहे.
सध्या मराठीमध्ये ‘रानबाजार’ या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु आहे. या सीरिजचा टीझर पाहता मराठीमधील ही सगळ्यात बोल्ड सीरिज असल्याचं बोललं जातंय. या सीरिजमध्ये सिनेसृष्टीमधील टॉपचे कलाकारही काम करताना दिसणार आहेत.
अभिनेता सलमान खान बॉलिवूडमधील महागड्या कलाकारांपैकी एक आहे. तो करत असलेला अवाढव्य खर्च पाहून तर अनेकांच्या भूवया उंचावतात. पण सलमान महिन्याला किती कोटी रुपये कमावतो हे आपण जाणून घेणार आहोत.
अभिनेता सनी देओलचा लेक करण देओल सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. करण द्रिशा रॉयला गेल्या बऱ्याच काळापासून डेट करत आहे. पण द्रिशा नेमकी आहे तरी कोण? हे आपण जाणून घेणार आहोत.
‘धाकड’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने तिरुपती बालजी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं, यादरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल अभिनेता संतोष जुवेकरच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने १४ वेळा विजेत्या इंडोनेशियाचा ३-० असा धुव्वा उडवण्याची अनपेक्षित कामगिरी करत थॉमस चषक स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासातील भारताचे पहिलेच जेतेपद ठरले. या ऐतिहासिक विजयानंतर तापसी पन्नूने तिच्या बॉयफ्रेंडसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर यांची दुसरी मुलगी खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून खुशी कपूर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची पहिली झलक समोर आली. त्यानंतर चित्रपटाबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. आता मुलीच्या पदार्पणावर वडील बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी दिवंगत पत्नी श्रीदेवी यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची लेक आराध्या बऱ्याचदा कॅमेऱ्यापासून लांब पळताना दिसते. पण यावेळी तिने चक्क कॅमेऱ्यासमोर पोझ दिल्या. आणि आराध्याचा हा नवा अवतार पाहून ऐश्वर्या मात्र तिच्याकडे एकटक पाहत राहिली. यादरम्यानचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. इतकंच नव्हे तर प्रत्येक विषयावर आपलं मत खुलेपणाने मांडताना ती दिसते. नुकतंच तिने केलेलं एक ट्विट सगळीकडे चर्चेचा विषय ठरलं होतं. यावरून तिला बरंच ट्रोल देखील करण्यात आलं. एका युजरने तर तिची तुलना थेट अभिनेत्री सोनम कपूरशी केली.
'सुख म्हणजे नक्की…' मालिकेतील 'शालिनी'साठी मल्हारची खास पोस्ट, म्हणाला…
अभिनेत्री माधवी निमकर 'सुख म्हणजे नक्की…' मालिकेत शालिनीची भूमिका साकारून घराघरात पोहोचली. माधवीचा आज वाढदिवस आहे. मालिकेत शालिनीच्या पतीची भूमिका साकारणारा अभिनेता कपिल होनरोवने वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत माधवीला शुभेच्छा दिल्या आहे.
यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘पोटरा’या चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटातील कलाकार छकुली देवकरच्या घरची परिस्थिती बिकट आणि हलाखीची आहे. त्यामुळे तिला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता. त्यानुसार छकुलीला तात्काळ एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप हिंदी भाषेवरून झालेल्या वादामुळे चर्चेत आला होता. हिंदी भाषेबाबत त्यानं केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता अजय देवगणनं त्याला ट्विटरवरून उत्तर दिलं होतं. आता किच्चा सुदीप त्याचा आगामी चित्रपट ‘विक्रांत रोना’मुळे चर्चेत आला आहे. बॉलिवूड विरूद्ध साउथ वादानंतर सलमान खान किच्चा सुदीपचा हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित करणार आहे.
Photos : बिकिनी,समुद्रकिनारा आणि सोनाली; चाहते म्हणाले ‘ती पाहताच बाला…’
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पती कुणाल बेनोडेकरसोबत मॅक्सिकोमध्ये हनिमून एन्जॉय करतेय. हनिमूनचे फोटो सोनालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
सोनालीचे बिकिनीतील फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा
माधुरी दीक्षितने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले, रुपेरी पडद्यावर तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आजही ती चित्रपट, वेबसीरिज तसेच रिएलिटी शो देखील करते. आपलं प्रत्येक काम जीव ओतून करणं ही तिची खासियतच आहे. माधुरीवर कितीही संकटं आली तरी आपल्या कामाला ती पहिलं प्राधान्य देते असं दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचं म्हणणं आहे.
कंटेंट हाच मराठी चित्रपटांचा राजा असतो हे अगदी खरं आहे. उत्तम कथाच प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये घेऊन येते. आता मराठी चित्रपट सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अभिनेता जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
Photos : 'धर्मवीर' चित्रपटातील अभिनेत्री श्रुती मराठेच्या नवऱ्याविषयी काही खास गोष्टी
मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच श्रुतीचा 'धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट प्रदर्शित झाला.
कॉमेडियन भारती सिंहचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तिने कॉमेडी करतेवेळी दाढी-मिशीबद्दल खिल्ली उडवली होती. मात्र तिला हा विनोद करणे महागात पडले आहे. या प्रकरणी तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल आणि तारक मेहता ही जोडी घराघरात प्रसिद्ध आहे. मात्र तारक मेहता हे पात्र साकारणारे शैलेश लोढा यांनी या मालिकेला रामराम केला आहे. जवळपास १ महिन्यापूर्वीच त्याने ही मालिका सोडल्याचे बोललं जात आहे.