Entertainment News Updates, 29 May 2022 : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. ही बी-टाऊनमधील सगळ्यात बहुचर्चित पार्टी होती. या पार्टीमधील किंग खान शाहरुखचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यासोबत या पार्टीत सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे देखील समोर आले होते. तर दुसरीकडे सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादामध्ये उडी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर त्याने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ला प्रदर्शित होणार आहे. त्याचा हा चित्रपट ‘केजीएफ २’ सारख्या सुपरहिट चित्रपटांनाही मागे टाकणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण यामागचं नेमकं कारण काय हे आज आपण जाणून घेणार आहोत.
अभिनेता कार्तिक आर्यन सध्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान तो कोलकाताला पोहोचला. यावेळी चक्क कार्तिकने टॅक्सीवर चढून चाहत्यांशी संवाद साधला. कार्तिकला पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी देखील केली. यादरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
बॉलीवूडपासून टॉलीवूडपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीबद्दल अनेक मोठी आणि धक्कादायक गुपिते उघड केली आहेत आणि त्यांच्यासोबत होणाऱ्या कास्टिंग काउचबद्दल खुलासे केले आहेत. त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपटांचे दिग्दर्शिक, निर्माता आणि लेखक गीता कृष्णा यांनी नुकतेच कास्टिंग काउचबाबत असे वादग्रस्त विधान केले आहे, ज्यानंतर सोशल मीडियावरून इंडस्ट्रीतील लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने (NCB) मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले नाही. या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि महककडे ड्रग्ज सापडलं नव्हतं. पण आर्यनने चौकशी दरम्यान कबूल केले होते की त्याने अमेरिकेत शिकत गांज्याचे सेवन करत होता.
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक आहे. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कलाकारांचे अचूक विनोद हे प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. गौरव मोरे हा त्यापैकी एक कलाकार आहे. गौरवला नुकताच भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौरवने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi EID Kabhi Diwali) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो सतत चर्चेत आहे. यापूर्वी शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि राघव जुयाल (Raghav Juyal) हे या चित्रपटात दिसणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर सलमान खानचा फर्स्ट लुक आणि शूटींगचे फोटो व्हायरल झाले, जे पाहिल्यानंतर चाहते चांगलेच उत्साहित झाले. आता या चित्रपटातून सलमानचा मेहूना म्हणजेच अभिनेता आयुष शर्माने (Ayush Sharma) काढता पाय घेतला आहे.
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याला सलाम करणारा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. आता एका इतिहास वेड्या प्रेक्षकाने ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ऑफर ठेवली आहे.
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मुळे चर्चेत आहे. दीपिका या फेस्टिव्हलच्या ज्युरी सदस्यांच्या टीममध्ये सहभागी आहे. सोशल मीडियावर सध्या दीपिकाचे या फेस्टिव्हलमधील लुक व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात तिच्या साडी पासून ते गाऊन पर्यंत चर्चा ही सर्वत्र सुरु आहे, पण या सगळ्यात तिच्या एका गाऊनची आणि तिच्या लूकची तुलना ही पती रणवीर सिंगच्या ‘खिलजी’ या ‘पद्मावत’ चित्रपटातील भूमिकेशी होत आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या बहुचर्चित ‘भूल भुलैय्या २’ (Bhool Bhulaiyaa 2) चित्रपटाला मिळत असलेलं यश एण्जॉय करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो देशभर फिरत आहे. लवकरच कार्तिकचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरत असेलल्या कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. करणने २५ मे रोजी त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने करणने एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी एकमेकांपासून बराच काळ लांब राहणारे सेलिब्रिटी देखील एकत्र दिसले. या पार्टीत सलमान खान (Salman Khan) आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) हे समोरा समोर आले होते, तर सलमानला पाहताच अभिषेक बच्चन त्याला भेटायला गेला अन्…
किंग खान शाहरुख सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतो. शाहरुख बी-टाऊनमधील अनेक पार्ट्यांना देखील आवर्जून हजेरी लावतो. बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेली पार्टी म्हणजे दिग्दर्शक करण जोहरचा ५०वा वाढदिवस. या पार्टीदरम्यानचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यामध्ये शाहरुखचा डान्स करतानाच व्हिडीओ देखील समोर आला आहे.
बॉलिवूड विरुद्ध साऊथ वाद संपायचं काही नाव घेत नाही. साऊथमधील काही कलाकारमंडळींनी वादग्रस्त विधानं केली आणि या वादाला तोंड फुटलं. त्यानंतर बॉलिवूडमधील बरीच कलाकार मंडळी यावर आपलं मत मांडताना दिसत आहेत. आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही या वादावर आपलं मत स्पष्ट केलं आहे.