आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाला आता सुरुवात झाली आहे. ७५वा कान्स चित्रपट महोत्सव २८ मे पर्यंत असणार आहे. यंदाच्या या चित्रपट महोत्सवात वेगवेगळे कार्यक्रम देखील राबवले जाणार आहेत. त्याचबरोबरीने सहा भारतीय चित्रपटांना कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. या सहा चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा समावेश आहे. ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे.

१७ मे २०२२पासून या चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपट महोत्सवाच्या पहिल्याच दिवशीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी हे फोटो शेअर करताना म्हटलं की, “भारतासाठी ऐतिहासिक क्षण. भारत देशाला कान्स चित्रपट महोत्सवामध्ये पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे.”

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा – Photos : मराठीमध्ये नवा प्रयोग, बोल्ड वेबसीरिजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची सोशल मीडियावर रंगतेय चर्चा

अनुराग यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्यासह नवाजुद्दीन सिद्दीकी, आर माधवनही दिसत आहेत. आर माधवनच्या ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ (Rocketry: The Nambi Effect) चित्रपटाची निवड या महोत्सवासाठी करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने शंकर श्रीकुमार यांचा ‘अल्फा बीटा गामा’, बिस्वजीत बोरा यांचा ‘बूम्बा राइड’, अचल मिश्रा यांचा ‘धुइन’, जयराज यांचा ‘ट्री फुल ऑफ पॅरेट्स’ हे चित्रपट देखील या महोत्सवामध्ये दाखवण्यात येणार आहेत.

आणखी वाचा – Photos : तेजस्विनी पंडितचे आजवरचे सगळ्यात हॉट लूक, मराठीमधील सर्वात बोल्ड सीरिजमध्येही करतेय काम

मराठी चित्रपटांची ‘कान्स’वारी
पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona), ‘गोदावरी’ (Godavari) या चित्रपटांनी कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मानाचं स्थान मिळवलं आहे. ७५व्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी ८ सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. चित्रपट महोत्सवात दीपिका ज्युरी म्हणून सध्या काम पाहत आहे. त्याचबरोबरीने सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा चित्रपट यंदा कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.