Entertainment News Updates 12 May : मनोरंजन क्षेत्रात सध्या हिंदी भाषा विरुद्ध इतर भाषेतील चित्रपटांसंदर्भात चांगलाच वाद रंगला आहे. बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य सिनेमा असं काहीसं चित्र रंगलेलं पाहायला मिळत आहे. यावर सध्या अनेक सेलिब्रिटी आपली मतं मांडत आहेत. तर दुसरीकडे विवेक अग्निहोत्री यांनी अक्षय कुमारनंतर आता त्याची पत्नी ट्विंकल खन्नालाही टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे मराठी मनोरंजन सृष्टीमधील लोकप्रिय नायिका सोनाली कुलकर्णीने पुन्हा लग्न केले आहे. तर दुसरीकडे धर्मवीर, हंबीररावसह अनेक नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
Entertainment News Headlines: चित्रपट, मालिकासह आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्व महत्वाच्या घडामोडी
अभिनेता प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर’ चित्रपटाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा होताना दिसतेय. हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे आणि प्रसाद ओक या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अशात चित्रपट प्रदर्शित होण्याआधी प्रसाद ओकनं ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं मराठी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील फरकावर भाष्य केलं.
अभिनेत्री छवी मित्तल मागच्या काही काळापासून स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. अलिकडेच तिची शस्त्रक्रिया झाली. याबाबत तिनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या शस्त्रक्रियेनंतरचा एक फोटो शेअर करत खूपच भावुक पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री मंदिरा बेदी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे बिकिनीमधील काही फोटो शेअर करताच तिच्या नव्या लूकची जोरदार चर्चा रंगत आहे.
‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रसाद ओकनं 'धर्मवीर'मधील आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी कशी तयारी केली तेव्हापासून ते पहिल्या दिवशी व्हॅनिटीमधून निघून सेटवर जात असताना त्याला काय अनुभव आला हे सांगितलं.
सध्या सगळीकडेच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटामध्ये दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण गेल्या बऱ्याच काळापासून दिग्दर्शन करत असलेल्या प्रसादला आनंद दिघे यांची भूमिका साकारण्यासाठी ऑफर कशी मिळाली आणि हा संपूर्ण योग कसा जुळून आला या विषयी त्याने 'लोकसत्ता डॉट कॉम'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
अभिनेता अक्षय कुमार हा काही दिवसांपासून त्याच्या पानमसालाच्या जाहिरातीवरून चर्चेत होता. या जाहिरातीत अक्षयसोबत अजय देवगण आणि शाहरुख खान देखील दिसले होते. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर त्याने सगळ्यांची माफी मागितली. यासगळ्यात एक नेटकऱ्याने चुकून अभिनेता सुनील शेट्टी यांना अजय देवगण समजून गुटख्याच्या जाहिरातीचा पोस्टर शेअर करत त्यांना टॅग केले. त्याविषयी आणि तंबाखुच्या विक्रि विषयी सुनील शेट्टी यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.
'धर्मवीर' या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच अभिनेता प्रसाद ओकने 'लोकसत्ता डॉट कॉम'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल भाष्य केले. “उद्धवजी माझी भूमिका पाहून भावूक झाले आणि त्यांना बाळासाहेबांची आठवण आली”, असे त्याने सांगितले.
काही कलाकार आजही सोशल मीडियाचा वापर करत नाहीत. तसेच काहींनी सोशल मीडियाला कायमचा रामराम केला असल्याचंही बऱ्याचदा समोर आलं. यामध्येच आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही समावेश झाला आहे. शिल्पाने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तिने ट्विटर आणि इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर करत याद्वारे माहिती दिली.
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच मत मांडताना दिसतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागच्या काही भाषणातून ते भाजपासोबत युती करणार की काय अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर टिका केली जात आहे. यावर आता दीपाली यांनी देखील एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता सलमान खानने ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावत कार्यक्रमाला चार चाँद लावले. यावेळी सलमानने प्रसादला आनंद दिघे यांच्या रुपात पाहिलं आणि त्याचं तोंडभरून कौतुक सुद्धा केलं.
अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे सध्याच्या अतिशय लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. ‘परफेक्ट फॅमिली’ आणि ‘परफेक्ट कपल’असलेल्या या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसलं असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ आणि उर्मिलामध्ये काही तर मतभेद सुरु आहेत, असेही म्हटलं जात आहे.
‘लग्नाची बेडी’ मालिकेत सायली देवधर आणि अभिनेता संकेत पाठक यांचा एक किसिंग सीन आहे आणि हा सीन कसा शूट झाला हे एका मुलाखतीत सायलीनं सांगितलं. यासोबतच तिनं मालिकेच्या सेटवरील अनेक धम्माल किस्से आणि गंमती जमतीदेखील शेअर केल्या.
‘भिरकीट’ चित्रपटाचे एक मजेदार पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरवरून चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. येत्या १७ जूनपासून ‘भिरकीट’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या हेमांगीने ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चा पोस्टर पाहिल्यानंतरल ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी हेमांगीने आनंद दिघेंच्या काही आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित होऊन २ महिने उलटून गेले असले तरीही सोशल मीडियावर हा चित्रपट अद्याप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटावर ‘सिंगापूर फिल्म फेस्टिवल’मध्ये बंदी घालण्यात आली. त्यावेळी काँग्रेस नेता शशी थरूर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यात ट्विटर वाद झालेला पाहायला मिळाला होता. आता आरोपी यासीन मलिकनं काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकादा शशी थरूर यांच्यासोबतच बॉलिवूड सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे.
Photos: 'तुझ्यात जीव रंगला'; हार्दिक-अक्षयाचा रोमँटिक अंदाज
झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका विशेष गाजलेली होती.
Photos: सोनाली कुलकर्णीच्या सासूबाईंना पाहिलंत का? सोशल मीडियावर होतेय चर्चा
मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे.
अभिनेता महेश बाबूने “बॉलिवूडला मी परवडणार नाही” असं विधान केलं आणि बॉलिवूडकरांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. आता बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी देखील या वादामध्ये उडी घेतली आहे. महेश बाबूच्या या वक्तव्यावर त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
महेश बाबूने केलेल्या विधानावर प्रसिद्ध चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांनी भाष्य केले आहे. “जर बॉलिवूडला त्याची किंमत परवडत नसेल तर ती चांगली गोष्ट आहे. मी त्याला त्याच्या भविष्याकरिता शुभेच्छा देतो. तो सध्या जिथे आहे, त्याचा मी आदर करतो.” असे मुकेश भट्ट म्हणाले.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट प्रचंड गाजला. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. या चित्रपटासाठी घेत असलेल्या मानधनाच्या बाबतीत अल्लूने फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकलं आहे. 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जून कोट्यावधी रुपयांचं मानधन घेत आहे.
काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूनं मी बॉलिवूडला परवडणार नाही, त्यामुळे हिंदी चित्रपटांवर मी अजिबात वेळ वाया घालवणार नाही असं वक्तव्य केलं होतं. यानंतर बॉलिवूड कलाकार यावर प्रतिक्रिया देत असून आता या वादात प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीनंही उडी घेतली आहे.
सध्या सारा अली खान काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतेय.
काही दिवसांपूर्वी हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही असे वक्तव्य दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने केल्यानंतर हा सगळा वाद सुरु झाला होता. त्यानंतर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट असा वाद सुरु झाला. आता त्यावर आता रणवीर सिंगने प्रतिक्रिया दिली आहे.
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा दीपिका आणि रणवीर यांनी स्क्रीन शेअर केली होती. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान रणवीरने चित्रपटातील किसिंग सीनचा किस्सा सांगितला आहे. “दीपिका आणि मी त्याक्षणी एकमेकांमध्ये इतके गुंतलो होतो की आमच्या खोलीत बाहेरुन दगड आल्याचे आम्हाला समजले नाही.” असे तो म्हणाला.
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लगीनगाठ बांधली आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.