Manoranjan News Updates, 21 May : सध्या कान्स महोत्सव २०२२ ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, हेली शाह, हिना खान यांच्या लुकची बरीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यननं पहिल्यांदा सारा अली खानसोबतच्या त्याच्या नात्यावर मौन सोडत त्यावेळी सर्व काही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नव्हतं असं म्हटलंय. याशिवाय देशात सुरू असलेल्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी विरुद्ध बॉलिवूड वादावर प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारनं प्रतिक्रिया दिली आहे. मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.