Trending Entertainment News Today, 07 June 2022 : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अखेर रिलेशनशिपबाबत कबुली दिली आहे. सोनाक्षीने इक्बाल जहीरसोबतच्या नात्याचा अखेर खुलासा झाला आहे. इक्बालनं सोशल मीडियावर सोनाक्षीला ‘आय लव्ह यू’ म्हणत रिलेशनशिपच्या चर्चांना पुष्टी दिल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या गृह विभागाने अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ५ जून रोजी सलमान याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यासोबतच जॉनी डेप आणि अँबर हर्ड या दोघांमध्ये सुरू असलेला मानहानीचा खटल्याचा निकाल लागला. जॉनी डेपने हा खटला जिंकल्यानंतर आता सौदी अरबच्या एका व्यक्तीनं अँबरला इन्स्टाग्रामवरून लग्नासाठी प्रस्ताव पाठवला आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.




Entertainment News live Updates : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. चित्रपटाबाबत बरीच चर्चा सुरु होती, मात्र बॉक्स ऑफिसवर निराशा झाली. आता यावर अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात सोनू सूदने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट ३ जूनला देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाबरोबरच सुप्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांचा ‘विक्रम’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. पण अक्षयच्या चित्रपटाकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली. शनिवार आणि रविवारी ‘सम्राट पृथ्वीराज’ने समाधानकारक कमाई केली. मात्र सोमवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला.
नुकतंच ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर काजोलने हजेरी लावली. यावेळी तिने चक्क मराठीत संवाद साधला. त्यावेळी तिने “मला कधीही सिनेसृष्टीत यायचे नव्हते”, असा खुलासा केला.
‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला जर मी हॉटसीटवर असतो/असते तर एवढी रक्कम नक्कीच जिंकली असती, असे वाटते. प्रेक्षक या शोची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. तर या शोचे ६ पर्व सोमवार ६ जूनपासून सुरु झाले आहे. कार्यक्रमाची सुरुवात ही एका विशेष भागापासून झाली होती. यावेळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध मायलेकींची जोडी अभिनेत्री तनुजा आणि अभिनेत्री काजोलने लावली होती. शोच्या प्रोमोचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी शोमध्ये मराठी बोलावं लागणार याची चिंता काजोलला सतावत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाहा काजोलचा हा मजेशीर व्हिडीओ…
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिच्या घरी पोलिस पोहोचल्याचे दिसत आहे. यामुळे तिच्या घरी पोलिस का गेले असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल मागच्या काही काळापासून सतत्याने चर्चेत आहे. दोघंही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून होताना दिसत आहेत. मात्र दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. पण आता सोनाक्षी सिन्हा आणि इक्बाल जहीर यांच्या नात्याचा अखेर खुलासा झाला आहे. इक्बालनं सोशल मीडियावर सोनाक्षीला ‘आय लव्ह यू’ म्हणत रिलेशनशिपच्या चर्चांना पुष्टी दिली आहे.
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील दयाबेन कधी परतणार? असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे. पण आता लवकरच या मालिकेत दयाबेन परतणार आहे.
समांथाने नुकतंच Burberry या कपड्याच्या ब्रँडसाठी एक बोल्ड फोटोशूट केले आहे. यात तिने बिकीनी परिधान केली आहे. यात ती फार बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. समांथाने शेअर केलेल्या या बिकीनी फोटोवर अभिनेत्री अनुष्का शर्मानेही कमेंट केली आहे.
‘द कपिल शर्मा शो’ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या विनोदी शैलीने हजारो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो. पण आता कपिलच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ काही वेळासाठी तरी सोनी टिव्ही वाहिनीवर प्रसारित होणार नसल्याचं समोर आलं आहे.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अमेरिकी सिंगर निक जोनस (Nick Jonas) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. प्रियांका आणि निक नुकतेच आई-वडील झाले आहेत. प्रियांका आणि निक दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. निक सध्या एका डान्स रिअॅलिटी शोचा परिक्षक आहे. तर नुकतीच निकने एका मुलाखतीत बॉलिवूड गाणं आणि डान्सवर असलेल्या त्याच्या प्रेमाविषयी सांगितले आहे.
Photos : ‘आश्रम’चं शुटिंग कुठं झालंय माहितीय का?; शुटिंगसाठी मोजलेल्या भाड्याचा आकडा थक्क करणारा
‘आश्रम ३’ या बहुचर्चित वेब सीरिजचा तिसरा सीझन ३ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दोन सीझनप्रमाणेच या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ‘आश्रम ३’ मध्ये दाखवण्यात आलेलं बाबा निरालाचं भव्य आश्रम भोपाळमध्ये आहे.
फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका शरद पोंक्षेंनी साकारल्या. शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ (Mi Nathuram Godse Boltoy) हे नाटक चांगलचं गाजलं होतं. या नाटकाच्यावेळी तर त्यांना अनेक प्रसंगांना सामोर जावं लागलं. एका मुलाखतीत त्यांनी याच नाटकातला एक प्रसंग शेअर केला होता.
बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिताला खरी ओळख ही पवित्र रिश्ता या मालिकेतून मिळाली होती. या मालिकेत अंकितासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुत मुख्य भूमिकेत होता. फक्त मालिकेत नाही तर खऱ्या आयुष्यातली त्या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. २०१८ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला तरी २०२० मध्ये सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. या गोष्टीला २ वर्ष झाल्यानंतर अंकिताने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
मागच्या काही दिवसांपासून जॉनी डेप आणि अँबर हर्ड (Actors Johnny Depp and Amber Heard) सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. दोघांमध्ये सुरू असलेला मानहानीचा खटला काही दिवसांपूर्वीच अखेर जॉनी डेपनं जिंकला. पण यानंतर अँबरला लग्नासाठी प्रस्ताव आला आहे. सौदी अरबच्या एका व्यक्तीनं अँबरला इन्स्टाग्रामवरून लग्नासाठी प्रस्ताव पाठवला आहे. सोबतच त्यानं एक वॉइस नोटही पाठवली आहे. ज्यात त्यानं अँबरचा पूर्वश्रमीचा पती जॉनी डेपपेक्षा आपण कसे उत्तम आहोत हे सांगितलं आहे.
छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या पर्वाचे विजेतपद विशाल निकम याने पटकावले. विशाल सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच त्याने हळद लागली, हळद लागली… अशा आशयची एक पोस्ट केली आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे.
अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेबसीरिजच्या ८ भागांपैकी ६ भाग प्रदर्शित झाले आहेत. या वेबसीरिजसाठी प्राजक्ताने चक्क ११ किलो वजन वाढवलं आहे. हे वजन वाढवण्यासाठी तिला फार मेहनत करावी लागली. नुकंतच एका मुलाखतीत बोलताना प्राजक्ताने वेबसीरिजसाठी वजन वाढवण्याबद्दल भाष्य केले.