चंदेरी दुनियेतील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. काही कलाकारांना तर त्यांच्या फॅशन सेन्समुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. इतकंच नव्हे तर एखाद्या कलाकाराचा लुक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला नाही तर सोशल मीडियावर ते ट्रोलिंगचा शिकार होतात. काही सेलिब्रिटी ट्रोलिंगकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पण कलाविश्वातील काही मंडळी याविषयी व्यक्त होताना दिसतात.
अभिनेत्री ईशा देओलच्या बाबतीत देखील असंच काहीसं घडलं आहे. ईशा तिच्या आगामी प्रोजेक्टच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. यादरम्यान तिचा वेगळाच लूक पाहायला मिळाला होता. चित्रीकरणा दरम्यानचा तिचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आणि तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. लोकांनी तिची तुलना तिचा भाऊ अभिनेता बॉबी देओलशी केली. पण याबाबत तिने एक खास पोस्ट शेअर केली.

“मी मुंबईमध्ये माझ्या आगामी प्रोजेक्टचं चित्रीकरण करत होते. अॅक्शन सीक्वेन्सचं चित्रीकरण सुरु होतं. त्यादरम्यान मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनच्या दिशेने जात असताना फोटोग्राफर्सच्या नजरेत मी आले. त्यानंतर माझे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाले आणि मला ट्रोल करण्यात आलं. या सीक्वेन्सचं चित्रीकरण करत असताना माझे विसकटलेले केस, घामाचं अंग असा अवतार होता. पण हा जर मी माझा भाऊ बॉबी देओलसारखी दिसत असेन तर थँक्यु.” असं ईशाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा – अपघाताच्या २६ दिवसांनंतर मलायकाचा ‘तो’ फोटो आला समोर, कपाळावर दिसली खूण
ईशाने या पोस्टच्या माध्यमातून ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. २००२मध्ये ईशाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. आता कुटुंब सांभाळत ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.