‘दिग्दर्शकाने मला शिव्या दिल्या आणि…’, ईशा गुप्ताने सांगितला सेटवरील धक्कादायक अनुभव

ईशाने एका मुलाखतीमध्ये हा अनुभव सांगितला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या अतरंगी फोटोंमुळे कायम चर्चेत असते. २०१२मध्ये तिने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘जन्नत २’ या चित्रपटामुळे ती चर्चेत आली होती. ९ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये ईशाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता एका मुलाखतीमध्ये तिने चित्रपटाच्या सेटवर उशिरा पोहोचल्यामुळे निर्मात्यांनी शिव्या दिल्या होत्या असा धक्कादायक खुलासा केला आहे.

ईशाने नुकतीच ‘बॉलिवूड लाइफ’ला मुलाखात दिली. या मुलाखतीमध्ये तिने चित्रीकरणादरम्यानचे अनुभव सांगितले आहेत. ‘तेव्हा माझी काहीच चूक नव्हती. निर्मात्याने मला काही तरी हिंदीमध्ये म्हटले आणि त्याला मी लगेच उत्तर दिले. त्यानंतर मी उशिरा सेटवर पोहोचली अशी तक्रार त्याने केली होती’ असे ईशाने म्हटले आहे.

पुढे ती म्हणाली, ‘मी शांत स्वभावाची आहे. मी उशिरा आले नाही हे त्यांना सांगितले. मी सर्वांच्या आधी सेटवर पोहोचले होते. माझा आऊटफिट शेवटच्या क्षणी बदलण्यात आला. यात माझी चूक नाही. त्यानंतर मला दिग्दर्शकाने शिव्या दिल्या आणि मला प्रचंड राग आला. मी तेथून निघून गेले. त्यानंतर निर्मात्यांनी माझी फोन करुन माफी मागितली. मी त्यांना दिग्दर्शकांना माझी माफी मागण्यास सांगा असे म्हटले. दिग्दर्शकांनी देखील माझी माफी मागितली आणि नंतर मी सेटवर पोहोचले. पुन्हा चित्रीकरणास सुरुवात केली.’

ईशाने ‘जन्‍नत 2’, ‘राझ ३डी’, ‘चक्रव्‍यूह’, ‘हमशक्‍ल्‍स’, ‘बेबी’, ‘रुस्‍तम’, ‘कमांडो २’ आणि ‘बादशाहो’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर आता ती देसी मॅजिक आणि हेरा फेरी ३ चित्रपटात दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Esha gupta reveals director of her film abused her on set she replied with same avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या