“आई आणि मुलीसोबत भारतात यायचं आहे पण…”, हॉलिवूड अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा

‘इटर्नल्स’ सिनेमातून सलमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

salma-hayek

हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायेकने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केलीय. नुकत्याच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सलमाने तिला आई आणि मुलीसह भारत दौऱ्यावर येण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र भारत भेटीसाठी ती काहीशी चिंतेच असल्याचं ती म्हणाली.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सलमा म्हणाली, “मला वाटतं मी लवकरच भारत भेटीला येईल. माझ्या आई आणि मुलीसोबत भारतात प्रवास करण्याचं माझं स्वप्न आहे. मात्र मी प्रत्येक वेळी जेव्हा कुणाला विचारचे की त्यांनी प्रवास कुठून सुरु करावा कारण भारतात खूप ठिकाणं आहेत तेव्हा मी नेहमी गोंधळून जाते. मात्र पुढच्या वेळी जेव्हा मला ब्रेक मिळेल तेव्हा मी नक्कीच येण्याचा प्रयत्न करेन” असं सलमा म्हणाली.

KBC 13: कतरिनाने विचारला असा प्रश्न की बिग बींची झाली बोलती बंद

तर सलमाचे भारतातील चाहते देखील तिच्या भारत दौऱ्याची वाट पाहत आहेत. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या ‘इटर्नल्स’ सिनेमातून सलमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती अजाकची भूमिका साकारणार आहे. क्लोई जाओ या ऑस्कर विजेत्या फिल्ममेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

या सिनेमाला बॉलिवूड टच देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सिनेमात कुमेल नानजियानी हा बॉलीवूड स्टारची भूमिका साकारणार आहे. एवढचं नव्हे तर सिनेमात ‘नाच मेरा हिरो’ हा हिंदी गाण्यावरी डान्स देखील पाहायला मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eternals star salma hayek says she very nervous to visit india know the reason kpw

ताज्या बातम्या