बाहुबली’मधील पात्रांच्या कपाळावरील टॅटूचे अर्थ माहित आहेत का?

तुम्हालाही कळेल की ‘बाहुबली’ सिनेमासाठी किती बारकाईने काम करण्यात आले आहे

actor prabhas, bahubali
अभिनेता प्रभास

‘बाहुबली २’ या सिनेमाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हा सिनेमा आजही सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. यावरूनच या सिनेमाचे यश किती आहे ते कळते. कधी कथेने तर कधी कलाकारांमुळे या सिनेमाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलेय. ‘बाहुबली’मधील कलाकार नक्की काय करतात, कसे राहतात या साऱ्याबद्दलच त्यांच्या चाहत्यांना जाणून घेण्याची इच्छा असते. हे कमी की काय पण आता या सिनेमातील पात्रांच्या कपाळावरील टॅटूंची चर्चा जोरदार रंगत आहे. या टॅटूंवर घेतलेली मेहनत त्यामागील विचार वाचून तुम्हालाही कळेल की ‘बाहुबली’ सिनेमासाठी किती बारकाईने काम करण्यात आले आहे. ‘बाहुबली’ सिनेमाच्या पात्रांमधील प्रत्येकाच्या कपाळावरील टिळा त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडणारा आहे.

baahubali

अमरेंद्र बाहुबली –
अमरेंद्र बाहुबलीच्या कपाळावरील अर्धचंद्र अनेक धर्मांमध्ये पवित्र मानले जाते. जनतेवर माया, प्रेम करणारा पण वेळ पडली तर रागावणारा अशा या माहिष्मती साम्राज्यातील रयतेच्या मनावर राज्य करणाऱ्या अमरेंद्र बाहुबलीच्या गुणांना दाखण्यासाठी अर्धचंद्र हा टॅटू दाखवण्यात आला आहे.

anushka-shetty-759

देवसेना –
देवसेनेच्या कपाळावरील टिकली नर आणि मादी या दोघांच्या गुणांचा मेळ दाखवते. देवसेनेच्या अंगी असलेले धाडस, लढाऊ वृत्ती, निडरता हे पुरुषी गुण पण त्याचबरोबर लावण्य, सुंदरता, प्रेमळपणा या स्त्री गुणांचा उत्तम मिलाप दर्शवणारी ही टिकली तिच्या व्यक्तिमत्वाला पुरेपूर न्याय देणारी आहे.

kattappa-baahubali-main

कटप्पा –
कटप्पाची माहिष्मती साम्राज्याविषयीची निष्ठा व प्रामाणिकपणा हेच त्या पात्राचे वैशिष्ट्य आहे. तो माहिष्मती साम्राज्याचा एक सेवक असतो. त्यामुळे सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीसमोर कटप्पाचं डोकं नेहमी झुकलेलं असायला हवं, म्हणून कटप्पाच्या कपाळावरील टिळादेखील त्याचपद्धतीने दाखण्यात आला आहे. हा टिळा गुलामीची व अगतिकतेची साक्ष देतो.

sivagami

शिवगामी –
शिवगामीच्या कपाळावर असलेली ठळक पूर्ण टिकली ही तिच्या भारदस्त व्यक्तीमत्वाचे व पूर्णतेचे दर्शन घडवते. धैर्य, स्वाभिमान, विश्वास यांचे प्रतिक असलेली ही पूर्ण टिकली बोलक्या, टपोऱ्या डोळ्यांच्या मधोमध असल्यामुळे शिवगामीच्या व्यक्तीमत्वाला अधिक तेज प्रदान करते.

bijjaladeva

बिज्जलदेव –
हिंदू पुराणानुसार त्रिशूळ हे व्यक्तीमधील सत्व, रजस व तमस हे तीन गुण दर्शवते. या तीन गुणांपैकी तामसिक गुण व्यक्तीची विचलित वृत्ती, गोंधळ, ज्वर, उतावीळपणा दर्शवतो. या गुणांना दर्शवण्यासाठी बिज्जलदेवच्या कपाळावर काळा त्रिशूळ दाखवण्यात आला आहे.

rana-baahubali-7591

भल्लालदेव –
भल्लाल देवच्या कपाळावरील उगवता सूर्य साधारणतः मध्यवयीन वाटतो. सूर्य जसा तळपता आहे तसाच भल्लाल देवचा तापट स्वभाव आहे. सूर्य कधीच बदलत नाही तो तसाच आहे. त्याचप्रमाणे भल्लाल देवही आपला राकट व तापट स्वभाव बदलणार नाही हेच त्याच्या कपाळावरील सूर्य दर्शवतो.

baahubali-2-look

महेंद्र बाहुबली –
महेंद्र बाहुबली म्हणजेच शिवुडू हा शंकराचा निस्सिम भक्त आहे. यामुळे त्याच्या कपाळावर व डाव्या बाहूवर सर्प व शंख कोरलेले आहे. यावरून महेंद्र बाहुबलीच्या मनातील शीव भक्ती दिसून येते. सिनेमाची संहिता लिहिताना आधी या पात्राला नंदी असे नाव देण्याचा विचार होता. नंतर या पात्राला शिवुडू नाव देण्यात आले.

badhra

भद्रा –
भद्राच्या कपाळावरील बैल हा सत्ता, तीव्रता व वर्चस्व गाजवणे या गुणांचे दर्शन घडवतो. हा बैल भद्राचा हट्टीपणादेखील दर्शवतो.

avantika1

अवंतिका –
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ध्येय असतेच. तसेच ते अवंतिकाच्याबाबतीतही आहे. देवसेनेला भल्लाल देवच्या जाचातून मुक्त करणे हे तिच्या आयुष्याचे ध्येय आहे. यासाठी तिने स्वतःलाच एक शस्त्र बनवले आहे, हे तिच्या कपाळावर गोंदलेल्या नक्षीवरुन स्पष्ट होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Every tattoo meaning in baahubali prabhas devsena kattappa shivgami