scorecardresearch

Video : “कोकण आणि ट्रेनचा प्रवास म्हणजे…” रुचिरा जाधवचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

तिने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे, बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते

ruchira kokan
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव ही कायमच चर्चेत असते. रुचिरा जाधव ही बिग बॉस मराठीमुळे सातत्याने चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर ती सक्रीय झाली आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती कोकणातल्या प्रवासाची छोटीशी झलक दाखवत आहे.

निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकण प्रदेशाची अनेकांना भुरळ पडते. कोकणातल्या लाल मातीतुन जशी पीक घेतली जातात तसे या मातीने अनेक थोर पुरुष, कलाकार या महाराष्ट्राला दिले आहेत. रुचिरा नुकतीच कोकणात एका कार्यक्रमासाठी गेली होती. तिने पोस्टमध्ये सांगितले आहे की “कोकण आणि ट्रेनचा प्रवास म्हणजे fav समीकरण, जाताना फ्लाईटने गेले परत येताना सुद्धा फ्लाईट तिकीट बुक केलं होत पण कोकणातून पाय निघत नव्हता. आपलं कोकण आहेच तसं मग काय कॅन्सल केलं तिकीट, अजून काही दिवस राहिले आणि नेक्स्ट डे ट्रेनने निघाले, कुडाळ स्टेशनवरचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

Photos : बॉलिवूडचे दिग्गज कलाकार मूग गिळून बसले होते तेव्हा प्रीती झिंटाने अंडरवर्ल्डच्या विरोधात उचललं होतं पाऊल

कोकणात जायच्या आधी काही दिवसांपूर्वी ती ती काश्मीरमध्ये फिरायला गेली असताना तिने फोटो शेअर केले होते. रुचिरा मूळची मुंबईची असून, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. ‘लकडाऊन’, ‘सोबत’ या मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात तिच्याबरोबरच तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदे हा देखील सहभागी झाला होता. रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे ही जोडी गोडीगुलाबीने बिग बॉसच्या घरात दिसली. पण नंतर त्यांचे खटके उडाले. त्यानंतर त्यांच्या ब्रेकअप झाल्याच्या चर्चाही रंगताना दिसल्या. पण आता अखेर रोहित-रुचिरा या दोघांचे पॅचअप झाले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 19:13 IST