अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर हे ३० एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले. करणची यापूर्वी दोन लग्ने झाली आहेत. करणने सर्वप्रथम टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमशी लग्न केले होते. मात्र त्यांचे लग्न केवळ वर्षभर टीकू शकले. त्यानंतर करणने जेनिफर विंगेट या अभिनेत्रीशी विवाह केला. करणचे हे लग्न तीन वर्षे टिकले. काही महिन्यांपूर्वीचा करण आणि जेनिफरचा घटस्फोट झाला. काही दिवसांपूर्वीच जेनिफरने करण-बिपाशाच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता करणची पहिली पत्नी श्रद्धा हिनेही प्रतिक्रिया दिली की, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देते. लग्नासाठीही त्यांना खूप सा-या शुभेच्छा. करणने श्रद्धाशी २००८ मध्ये लग्न केले होते. पण जास्त काळ हे लग्न टीकले नाही. वर्षभरातचं त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर करनने २०१२ मध्ये जेनिफरशी लग्न केले, पण २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. याच दरम्यान चित्रपटात बिपाशा आणि करणची जवळीकता वाढली आणि आता त्यांनी एकमेकांशी लग्न केले.