EXCLUSIVE : ‘होणार सून ..’ फेम मनिषही अडकणार लग्नाच्या बेडीत

जाणून घ्या, त्याच्या होणाऱ्या पत्नीविषयी सविस्तर माहिती

सचिन देशपांडे

‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता रोहन गुजर काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकला होता. मालिकेतील जान्हवीच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या रोहनपाठोपाठ आता तिचा मित्र मनिष म्हणजेच सचिन देशपांडेही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

सध्या सचिन ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत श्रेयसची भूमिका साकारतोय. मालिकेत तो त्याच्यासाठी मुलगी शोधत असला तरी खऱ्या आयुष्यात त्याचा जोडीदाराचा शोध संपला आहे. ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर पियुषा आणि माझी ओळख झाल्याचे सचिनने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितले.

वाचा : राणी मुखर्जीच्या लग्नाबाबतही कोणालाच माहिती नव्हती- अनुष्का शर्मा

सचिन म्हणाला की, मी अरेंज मॅरेज करतोय. पियुषा बिदनूर असं तिचं नाव आहे. फक्त १५ दिवसांमध्येच सर्व गोष्टी ठरल्या. आम्ही केवळ चारवेळा एकमेकांना भेटलो. त्यातही आमचे घरचे त्यावेळी आमच्यासोबत असायचे. केवळ एकदाच आम्ही बाहेर भेटलो आणि एकमेकांशी बोललो. पियुषाला माझ्यावर खूप विश्वास आहे. मुख्य म्हणजे तिचा हा विश्वास तिच्या बोलण्यातूनही झळकतो. तिची हीच गोष्ट मला फार आवडते.

येत्या गुरुवारी पुण्यात सचिन-पियुषाचा साखरपुडा होईल. ‘ सर्व काही खूप पटापट ठरल्यामुळे घरात सध्या लगबग सुरू आहे. पुण्यात केवळ आमच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा होईल. माझं इतक्या वर्षांपासून असलेलं ‘सिंगल’ स्टेटस तू अवघ्या १५ दिवसांत बदलून टाकलंस, असं मी तिला अनेकदा मजेत म्हटल्याचे सचिनने सांगितले.

वाचा : अतुल कुलकर्णी म्हणतो, ‘मला माफ करा पण..’

पियुषाचे बालपण मिरजेत गेले मात्र सध्या ती पुण्यात वास्तव्याला आहे. तीने फायनान्स अॅण्ड मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे. तिच्या आईसोबत सध्या ती पुण्यात एक हॉटेल सांभाळते. तिला एक लहान भाऊही आहे. साखरपुडा साधेपणाने होणार असला तरी लग्न मात्र मुंबईत दणक्यात करणार असल्याचे सचिनने सांगितले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Exclusive honar soon me hya gharchi fame sachin deshpande getting married

ताज्या बातम्या