scorecardresearch

Premium

“तेव्हा त्यांनी महेशला न मागता पैसे दिले होते…” पत्नी मेधा मांजेरकरांनी सांगितला शिवाजी साटम यांचा ‘तो’ किस्सा

यावेळी महेश मांजरेकर यांच्या पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी शिवाजी साटम यांची एक आठवण सांगितली.

Shivaji Satam mahesh manjrekar Medha Manjerkar
शिवाजी साटम, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर

मनोरंजनाचा डबल डोस घेऊन ‘दे धक्का २’ चित्रपट अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरताना दिसत आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाने पहिल्या भागात केलेली हीच धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. मनोरंजनाचा डबल डोस घेऊन ‘दे धक्का २’ चित्रपट शुक्रवारी (५ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘दे धक्का २’ च्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी सर्व कलाकारांनी अभिनेते शिवाजी साटम यांच्या काही गोड आठवणी सांगितल्या. यावेळी महेश मांजरेकर यांच्या पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी शिवाजी साटम यांची एक आठवण सांगितली.

शिवाजी साटम यांनी मांजरेकर कुटुंबाला अडचणीच्या काळात कशाप्रकारे मदत केली, याबद्दलची एक भावूक आठवण शेअर केली आहे. त्यांची ही आठवण ऐकून सर्वजण भारावून गेले. हा किस्सा सांगताना मेधा मांजरेकरही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मेधा मांजरेकर म्हणाल्या, “आमच्या आयुष्यातील तो अतिशय वाईट आणि खडतर काळ होता. त्यावेळी महेशचे ऑफिस त्याच्या घरीच होते. तो तिथे बसला होता. त्यावेळी शिवाजी साटम यांचा मुलगा म्हणजे अभिजीत साटम हा अचानक तिथे आला.”

actor jitendra talks about marathi people
“मराठी लोकांमध्ये हावरटपणा नव्हता”, जितेंद्र यांनी केलं कौतुक; म्हणाले, “तेव्हा लबाड…”
kumar-sanu
वडिलांच्या निधनाच्या दिवशी कुमार सानू यांनी दिलेला आयुष्यातील सर्वात बेस्ट परफॉर्मन्स; म्हणाले, “मी हास्य…”
dr Balram Bhargava after seeing nana patekar in the vaccine war
‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये नाना पाटेकर यांना स्वतःच्या भूमिकेत पाहून भावुक झाले डॉ. बलराम भार्गव, म्हणाले…
Tanuja Birth Day Special
अभिनेत्री तनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या कानशिलात का लगावली होती? नेमकं काय घडलं होतं तेव्हा?

Exclusive : ‘मी शूटींग बंद करतोय…’ म्हणत सिद्धार्थ जाधववर संतापले महेश मांजरेकर, वाचा नेमकं काय घडलं?

“त्याने समोर असलेल्या टेबलावर एक पाकिट ठेवले आणि तो निघून गेला. काही वेळाने आम्ही ते पाकिट बघितले तर त्या पाकिटात काही पैसे होते. आम्ही कधीही शिवाजी साटम यांना पैशांबाबत विचारणा केली नव्हती. त्यांच्याकडे मागितलेही नव्हते. पण जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी न विचारता न मागता ते पैसे दिले होते. असा आमचा शिवाजी…”, असे मेधा मांजरेकर यांनी सांगितले.

Exclusive Video : ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करणार आहेस का? सिद्धार्थ जाधव म्हणाला, “माझा विचार…”

दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. तसेच अमेय खोपकर यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दे धक्का २ हा चित्रपट ५ ऑगस्टपासून संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Exclusive shivaji satam helped the mahesh manjrekar family during difficult time medha manjerkar reveled nrp

First published on: 07-08-2022 at 17:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×