भारतीय पौराणिक कथेनुसार गरुडाचे पंख हे त्याचे सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक होते, जे विश्वाच्या भ्रमणावर परिणाम करू शकतात. गुलाम म्हणून जन्म घेतलेल्या आणि आपल्या राजवंशाबाबत अनभिज्ञ असलेल्या गरूडाने अतूट समर्पितता व अद्वितीय धैर्य दाखवले, जे भारतीय पुराणामध्ये कोरले गेले. हीच कथा आता सोनी सब वाहिनीवरील ‘धर्म योद्धा गरूड’ या मालिकेतून सादर करण्यात येणार आहे. १४ मार्चपासून संध्याकाळी ७ वाजता ही मालिका सुरु होणार आहे.
‘धर्म योद्धा गरूड’ ही मालिका नि:स्वार्थीपणा, प्रामाणिकपणा, आज्ञाधारकता व शौर्य यांच्याशी संलग्न असलेला भगवान विष्णूचा भक्त व वाहन गरूडला सादर करते. मालिका गरूडाच्या जन्मासह सुरू होते. तो महान ऋषी कश्यप व विन्ता यांचा पक्षी-मानव मुलगा म्हणून जन्म घेतो. त्याच्यामध्ये अविश्वसनीय सामर्थ्य व शक्ती असते. तरीदेखील त्याला त्याची दुष्ट काकी कद्रू व त्याच्या चुलत भावंडांसह कालिया व १००० सापांच्या आदेशांचे पालन करावे लागते.
कथानक आई-मुलाच्या नात्यामधील अद्वितीय पैलू आणि प्रत्येक सरत्या दिवसासह ते कशाप्रकारे बहरत जाते, तसेच ते सामना करणाऱ्या आव्हानांना दाखवते. गरूडची आई विन्ताप्रती एकनिष्ठता आणि या विश्वामध्ये त्याच्या कर्तव्याप्रती समर्पितता त्याला ‘धर्म योद्धा गरूड’ बनवतात.
अत्याधुनिक तंत्रज्ञान व व्हीएफएक्सचा समावेश असलेली मालिका ‘धर्म योद्धा गरूड’ रिअल-टाइम व्हर्च्युअल प्रॉडक्शन टेक्निक – अल्टिमेटचा वापर करत निर्माण करण्यात आली आहे. पहिल्यांदाच भारतीय टेलिव्हिजनवर अल्टिमेटचा वापर करण्यात आला आहे. इल्यूजन रिअॅलिटी स्टुडिओजने मालिकेसाठी अद्भुत व्हीएफएक्सवर काम केले आहे. ही मालिका सोनी सबचे अभूतपूर्व कथानक सादर करण्याचा भव्य प्रयत्न आहे.
‘धर्म योद्धा गरूड’ या मालिकेत लोकप्रिय अभिनेता फैजल खान हा मुख्य भूमिकेत असून इतर अनेक प्रतिभावान कलाकार जसे अंकित राज, पारूल चौहान, तोरल रासपुत्र, ऋषिकेश पांडे, विशाल करवाल, अमित भानुशाली हे प्रमुख भूमिकेत आहेत. ‘धर्म योद्धा गरूड’ ही कौटुंबिक नाते, शौर्य व निर्धाराची प्रेरणादायी कथा आहे, जी निश्चितच सर्वांना अचंबित करण्यासोबत सोनी सबवर सर्वांचे लक्ष वेधून घेईल.